हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने उडीदची खरेदीला आणि सोयाबीन खरेदीची नोंदणीला आजपासून सुरुवात होणार आहे. याविषयीची माहिती पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. केंद्र शासनाने उडीदासाठी हमीभाव प्रति क्किंटल ६ हजार रुपये जाहीर करणयात आला आहे. चालू हंगामात उडीद आणि सोयाबीनची आवक बाजारात सुरू झाली आहे.
बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी १५ सप्टेंबर २०२० पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार उडीद केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविणयात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्घतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी आप आपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरीत आधारकार्डाची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा.
दरम्यान केंद्र सरकारकडे हमीभावाने उडीद खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव ३१ ऑगस्ट २०२० ला पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे, तर सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यात यावा याचा प्रस्ताव केंद्राकडे १८ सप्टेंबर २०२० ला पाठविण्यात आला होता. असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान केंद्रा सरकारने प्रति क्किंटल सोयाबीनसाठी हमीभाव हा ३ हजार ८८० रुपये असा जाहीर केला आहे. बाजार भाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. खरेदी केद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी १ ऑक्टोबर २०२० पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे.
Share your comments