रोख व्यवहारामध्ये पारदर्शकता येण्यासाठी भारत सरकारने एक निर्णय घेतला असून तो म्हणजे भारतात बँकांमधून, पोस्टातून पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी आता पॅन किंवा आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.
या नियमामुळे एका आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला जर सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिस सह इतर बँकेच्या खात्यांमधून वीस लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर संबंधित ग्राहकाला आधार आणि पॅन नंबर द्यावा लागणार असून हा नियम चालू खाते उघडतील त्याच्यासाठी देखील लागू होईल.
अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मे महिन्यात जारी केलेल्या अधीसूचनेत दिली आहे. यानुसार आता ग्राहकाला पोस्ट ऑफिस, सहकारी किंवा राष्ट्रीयीकृत बँकांमधून व्यवहार करायचा असेल तर पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक खाते क्रमांक गरजेचा केला आहे. तसेचग्राहकाकडे संबंधित कागदपत्र आहे की नाही याची खात्री देखील बँक अधिकाऱ्यांनाकरून द्यावी लागणार आहे.
काय होता अगोदरचा नियम?
अगोदरच्या नियमानुसार जर तुम्हाला एका दिवसात पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करायचे असेल किंवा काढायची असेल तर तेव्हा पॅन कार्ड आधार कार्ड लागत होते.
या नियमांमध्ये 114बी नुसार रोख ठेव किंवा ठेव काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वार्षिक मर्यादा अगोदर नव्हती.जे काही मर्यादा होती ती फक्त बँकांमध्ये असलेल्या ठेवीवर लागू होती. त्यामुळे रोकडा व्यवहार फार मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता. त्यामुळे सरकारने या नियमांमध्ये बदल केला आहे.
हा नियम राष्ट्रीयीकृत बँक व पोस्ट ऑफिस यांनाच लागु नसून सहकारी संस्थांना देखील लागू असेल. यामुळे तुम्हाला संबंधित बँकांमधून वीस लाखांपेक्षा अधिकचा व्यवहार करायचा असेल तर आधार आणि पॅन कार्ड अनिवार्य असणार आहे.
असे नियम बदलवण्यामागील कारणे?
या नियमांमध्ये बदल करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे रोखीचे व्यवहार अगदी सहजरीत्या सरकारला शोधता यावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.छोट्या छोट्या व्यवहारांमधील होणारी कर चोरी नोटाबंदी नंतर देखील मोठ्या प्रमाणात सुरू होती.
अशा करचोरी चा शोध घेणे सरकार पुढे मोठे आव्हान होते मात्र आता या नवीन नियमामुळे तुम्ही एक रुपयांचा व्यवहार केला ते देखील शोधणे सोपे होणार आहे. तसेच पैसे काढणे आणि ठेवी ठेवण्यासाठीचा हा नियम आर्थिक फसवणूक कमी करण्यासाठी देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
यामुळे ज्या ग्राहकांकडे पॅन कार्ड नाही परंतु व्यवहार मोठ्या प्रमाणात रोख स्वरूपात करतात आणि इन्कम टॅक्स भरत नाहीत अशा ग्राहकांचा शोध घेणे सोपे होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Share your comments