गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर वाढत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. असे असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत आता १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार आहे. यामुळे याची झळ बसणार आहे.
शेतकऱ्यांना सध्या हा व्यवसाय परवडू लागला आहे. यामुळे त्यांना चार पैसे मिळत आहेत. आता सुट्टे दूध एक लिटर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागणार आहेत. खरेदीदारांना याची झळ बसत असली तरी शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत आहे.
दरम्यान, चाऱ्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे, याचे दर दुप्पट झाले आहेत. तूर, हरभऱ्याच्या किमती १५ ते २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे दूध दरात वाढ केल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकरी याबाबत अनेक दिवसांपासून मागणी करत होते.
ई-वाहनांवर सबसिडी योजनेबाबत केंद्राचा मोठा निर्णय, नवीन नियम 1 सप्टेंबरपासून लागू होणार..
दरम्यान, सुटे दूध ७ रुपयांनी महागणार आहे. हे दर फक्त मुंबई पुरते वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात दुधाचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे. अनेक संघांनी हे दर वाढवल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! शेतकरी नेते पाशा पटेलांना पुत्र शोक, हसन पटेल यांचे निधन..
सरकारने संभाजीराजेंना मॅनेज केल्याचे दिसतंय, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या आरोपाने खळबळ
राज्यातील देवस्थान बोर्डाच्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कधी होणार? शेतकरी आक्रमक
Share your comments