नाशिक विभागातील सर्व शेतकऱ्यांना सातबारा उतारा मोफत वाटण्याचेनिर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रात 41 लाख 78 हजार 329 खाते धारक असून नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने पहिल्यांदा राज्य शासनासमोरहाविषय मांडला होता.
तोशासनाने मान्य केला असून राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना मोफत सातबारा उतारा वाटपाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सुरुवात झाली.
नाशिक विभागात एक लाख 46 हजार नऊशे अठरा इतक्या सातबारा उतारा यांचे मोफत वाटप झाले असून त्वरित उताऱ्यांचे वाटपही लवकरच पूर्ण होईल.
तसेच शेतकऱ्यांना सातबारा उतारे मोफत वाटल्यामुळे जमिनीच्या अभिलेखातील त्रुटी दूर करून सर्व अभिलेख परिपूर्ण वअद्ययावत करण्यास मदत होईल तसेच जमिनी विषयी वाद व तंटे कमी होण्यास मदत होईल. असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी म्हटले.
सातबारा उतारा हा जिव्हाळ्याचा विषय
सामान्य शेतकरी व नागरिकांसाठी सातबारा उतारा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आता हा सातबारा उतारा घेऊन शासनाचा महसूल विभाग शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या दारात जाणार आहे.
सातबारा उतारा जमिनीचा आरसा असून त्याच्यावर एकूण क्षेत्र, क्रमांक, व इतर महत्वाच्या नोंदी असतात. उताऱ्यांचे संगणकीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून शासनाने शेतीसंबंधी अनेक गोष्टी ऑनलाइन केलेले आहेत.( स्त्रोत- सकाळ)
Share your comments