1. बातम्या

विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक; अर्जावर नोंदवले जात आहे कमी नुकसान

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ४२ मंडळ पैकी ३० मंडळ मध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांची शेतकरी बांधवानी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केलं जात आहे.

त्यानुसार जिल्ह्यात १ लाखाच्या वर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या ऑनलाईन तक्रारी दाखल झाल्या आहेत. परंतु विमा कंपन्या मात्र शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. विम्याच्या अर्जावर नुकसान कमी दाखवण्यात येत असल्याचं समोर आले आहे. याविषयीचा खुलासा चक्क खासदारांनी केला आहे.

विम्याविषषी खासदारांनी व्यक्त केली शंका

शेतकऱ्यांची पंचनामे करण्यात येत आहेत. परंतु माझ्या असे निदर्शनास आले आहे की, पंचनामे करणारे अधिकारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईच्या फॉर्मवर फक्त शेतकऱ्याचे नाव टाकून कोऱ्या फॉर्मवर कोणतीही नुकसान भरपाईची आकडेवरी न टाकता शेतकऱ्यांच्या सह्या घेत आहेत. आपण कोऱ्या फॉर्मवर सही केल्यास आपल्या सहीचा फॉर्मवर विमा कंपनीचे अधिकारी आपले झालेले नुकसान कमी दाखवून आपल्याला मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित ठेवू शकतात. अशी पोस्ट खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडिया वरती केली आहे.

 

माझी सर्व शेतकरी बांधवाना विनंती आहे की, आपल्या शेतातील पीक नुकसानीचा फॉर्मवर शेतकऱ्यांचे नाव, गट नं, क्षेत्र, नुकसानीची टक्केवारी पूर्ण योग्यरित्या संपूर्ण फॉर्म भरलेली पडताळणी केल्याशिवाय सही करू नये. संपूर्ण माहिती योग्यरित्या भरावी व ७० टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवून आपली सही व पाच साक्षीदारांच्या सह्या कराव्यात.

आपण केलेल्या नोंदणी व योग्य ती कार्यवाही होऊन आपल्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी आम्ही राज्यस्तरावर आणि केंद्रस्तरावर सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. तसेच काही तक्रार असल्यास माझ्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी विनंतीकरण्यात आली आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters