देशातील जलाशयांमध्ये ४० टक्के पाणीसाठा

08 May 2020 12:13 PM


मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिकचा पाणीसाठा आहे. देशातील धरणांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक  असून  महत्त्वाच्या १२३ जलाशयांमध्ये ६८.०३६ अब्ज घन मीटर पाणीसाठा  आहे. एकूण जिवंत पाणीसाठ्यात ४० टक्के साठा शिल्लक आहे.  गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा ६३ टक्के अधिक साठा आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्याविषयी आपण चर्चा केली तर मागील वर्षी उशिरापर्यंत पाऊस झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

फेब्रुवारीमध्ये पुढारी या वृत्तसंस्थेने दिेलेल्या एका वृत्तानुसार, २९.०१ टक्के पाणीसाठा हा जिवंत आहे. इतकेच काय मराठवाड्यातील ९६४ धरणांमधील जलसाठा  ९.०१ टक्क्यावरून ५५ टक्के इतका झाला आहे. राज्यातील धरणांची एकूण जलक्षमता ४० हजार ८९७.९५ दक्षलक्ष घन मिटर्स इतकी असून सध्या या धरणांमध्ये २५ हजार ९९३.५६ दक्षलक्ष घन मिटर्स इतका जिवंत पाण्याचा साठा आहे. गेल्या वर्षी ६ मे रोजी ४१.६८० अब्ज घन मीटर पाणी शिल्लक होते. तर गेल्या दहा वर्षातील सरासरीपेक्षा ५९ टक्के अधिक पाणीसाठा आहे.  

उत्तर भारतात ४५ टक्के पाणीसाठा आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमधील जलाशयांमध्ये  ८.६४ घनमीटर पाणीसाठा होता. जिवंत साठ्यापैकी ४५ टक्के पाणी शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात ४८ टक्के पाणी शिल्लक होते.  पुर्व भारतातील झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि नागालँड या राज्यांमध्ये ४२ टक्के पाणी साठा आहे. येथील जलशयांमध्ये ८.२२ अब्ज घन मीटर पाणी आहे. गेल्यावर्षी याचकाळात ३० टक्के साठा होता. पश्चिम भारतातील गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधील जलशयांमध्ये १.६० अब्ज घन मीटर पाणीसाठा शिल्लक आहे.

एकूण जिवंत पाणीसाठाच्या ४१ टक्के पाणी जलाशयांमध्ये शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच काळात या दोन राज्यांमध्ये केवळ १६ टक्के साठा होता. तर गेल्या दहावर्षातील याच काळातील पाणीसाठ्याची सरासरी २४ टक्के होती.  मध्य भारतातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांमधील १९ जलाशयांमध्ये ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. जलाशयांमध्ये २०.९८ अब्ज घनमीटर पाणी शिल्लक आहे. दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, आणि तामिळनाडू या राज्यांतील ३६ जलाशयांमध्ये ३० टक्के पाणीसाठा होता. जिवंत साठ्यांपैकी १५.५९ अब्ज घन मीटर पाणी शिल्लक होते.

Water dams water storage fourty percent water in dams देशातील धरणांमध्ये ४० टक्के पाणीसाठा धरणातील पाणीसाठा
English Summary: Fourty percent water storage in india's dam

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.