बारामती तालुक्यातील खांडज येथे गोठ्यातील बायोगॅस टाकीची साफसफाई करताना एकाच कुटुंबातील चार लोकांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. या चार जणांमध्ये बाप-लेकाचा समावेश आहे. गायीच्या गोठ्यातील शेण आणि गोमूत्राची टाकी साफ करत असताना चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
खांडज येथे जनावरांच्या मलमूत्राच्या साठवण केलेल्या टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाला. चेंबरची स्वच्छता करण्यासाठी एक जण टाकीत उतरला होता, परंतु तो अडकल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बाकीचे गेले आणि यामध्ये चौघांचा सुद्धा दुर्दैवी अंत झाला. टाकीत पडून गुदमरल्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल केलं होत, मात्र त्यापूर्वीच त्यांनी आपला प्राण सोडला.
भानुदास अंबादास आटोळे (वय ६०) , प्रवीण भानुदास आटोळे( वय ३२), प्रकाश सोपान आटोळे(वय ५५) आणि बाबा पिराजी गव्हाणे(वय ३८) अशी या चौघाजणांची नावे आहेत. यामधील भानुदास अंबादास आटोळे आणि प्रवीण भानुदास आटोळे हे पिता- पुत्र आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह अनेक लोकांनी बारामती शहरातील सिल्वर जुबली हॉस्पिटलकडे धाव घेत गर्दी केली.
मोठी बातमी! अखेर संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय
Share your comments