1. बातम्या

कृषी शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी चार नव्या प्रकल्प होणार सुरू

राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी चार नव्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषदेच्या २२ फेब्रुवारीला झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कृषीमंत्री दादा भुसे, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने यावेळी उपस्थित होते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी  चार नव्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषदेच्या २२ फेब्रुवारीला झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कृषीमंत्री दादा भुसे, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने यावेळी उपस्थित होते.

डॉ. पंजाबराव देशमुख अकोला कृषी विद्यापीठाच्या अखत्यारित काटोल, नागपूर,अकोला अशा तीन ठिकाणी संत्रा गुणवत्ता सुधारणा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यासाठी ८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या मध्यवर्ती परिसरात नवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यास परिषदेने मान्यता दिली. हवामान अद्यावत कृषी व जल व्यवस्थापन असे अभ्यासक्रमाचे नाव आहे.

 

राहुरी विद्यापीठाच्या अखत्यारित असलेल्या पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात देशी  गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र उघडण्याचा विषय परिषदेने मान्य केला. अकोला कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेतीमधील पीक संरक्षणाचे तंत्र हा आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास देखील परिषदेने मान्यता दिली. यासाठी विद्यापीठाने हंगेरीतील डेब्रेसिन विद्यापीठ करार केला गेला आहे. मराठवाड्यातील हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे हवामान बदलाच्या अवस्थांचा अभ्यास करुन संशोधन होणे गरजेचे झाले आहे.

 

त्यासाठी स्वंतत्र केंद्र परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ स्थापन करण्यास परिषदेने मान्यता दिली आहे. बैठकीत कुलगुरू डॉ. विलास भाले (अकोला), डॉ. एस डी सावंत (दापोली), डॉ. अशोक ढवण (परभणी) यासह परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर आदी सदस्यांनी भाग घेतला.

English Summary: Four new projects will be launched to promote agricultural education and research Published on: 25 February 2021, 11:36 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters