1. बातम्या

अबब ! लांबच लांब, चवळीची शेंग चक्क चार फूट लांब

KJ Staff
KJ Staff


आपण म्हणतो ना निसर्गाची किमया पुढे कुणाचच काही चालत नाही. केव्हा काय अद्भुत घडेल याचा भरवसा राहत नाही आणि काही गोष्टींचा आपल्याला विश्वास नाही पटत. परंतु अशीच एक अविश्वसनीय घटना भंडारा जिल्ह्यात घडली नेमके काय घडले किंवा काय चमत्कार झाला त्या पण खाली पाहू.

सध्याच्या काळामध्ये बियाण्यांच्या संशोधन क्षेत्रामध्ये अद्भुत अशी प्रगती होत आहे. नवनवीन बियाणे विकसित केले जात आहेत त्यातच सवयीची एक जात विकसित करण्यात आले आहे, तिचे नाव आहे ब्रिंजल चवळी.  या वाणाची लागवड केल्यानंतर चक्क चार फूट लांबीची चवळीची शेंग वेलाला लागली आहे. भंडारा जिल्ह्यांमध्ये लाखांदूर तालुका आहे या तालुक्यातील सरांडी बुद्रुक येथील मुनेश्वर राऊत यांनी त्यांच्या शेतात हे वाण लावले आहे. त्यांच्या शेतात या शेंगा बहरत आहेत.

त्याचे झाले असे की, मुनेश्वरराऊत यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या जवळच्या एका नातेवाईकांकडून ब्रिंजल नावाचे चवळीचे वान आणले होते. पावसाळा सुरू होण्याच्या प्रारंभी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये त्याची लागवड केली. त्यांनी लागवड केलेल्या एकूण २५ वेली पैकी २३ वेलींना शेंगा आल्या आहेत. पण त्यातील एका वेलीवर चार ते पाच फूट लांबीच्या शेंगा लागलेल्या आहेत. या शेंगांचे वजन दीड किलो एवढे आहे.  दोडक्या सारख्या दिसणाऱ्या शेंगांची भाजी दोडक्या सारखे चविष्ट होते असे ते सांगतात.  परंतु एवढे मोठे शेंगा पाहून परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters