भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख अनेकांगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाजपेयी प्रकृती खालावल्यामुळे गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. गुरुवारी संध्याकाळी ५.५ मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर राष्ट्रीय स्मृतीस्थळी उद्या म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात अंत्य दर्शनासाठी ठेवले जाणार आहे अशीही माहिती मिळते आहे.
किशोरवयात असताना त्यांनी स्वातंत्र्यलढढ्यात सहभाग घेतला व ते तुरुंगात गेले. काही काळ त्यांनी कम्युनिस्ट विचारप्रणालीलाही जवळ केलं. परंतु नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले व शेवटपर्यंत संघपरिवाराचा अतूट हिस्सा राहिले. जनसंघासाठी काम करण्यापूर्वी संघाच्या मासिकासाठी काम करण्यासाठी त्यांनी १९५० मध्ये शाळा सोडली व नंतर त्यांची राजकीय मुळे संघात पक्की झाली. अटलबिहारी वाजपेयी हे तीन वेळा भारताचे पंतप्रधान होते. १९९८ मध्ये ते केवळ तेरा दिवस पंतप्रधान होते. त्यानंतर दुसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचे सरकार 13 महिने टिकले. त्यांची तिसरी पंतप्रधानपदाची कारकिर्द मात्र पूर्ण मुदतीची होती. मे १९९८ मध्ये अमेरिकेसह विकसित देशांचा रोष पत्करून पोखरण येथे अणुचाचण्या करण्यामागे पंतप्रधान म्हणून वाजपेयींनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती.
क्या हार में, क्या जीत में, किंचित नही भयभीत मैंं,
कर्तव्य पथ पर जो भी मिला, यह भी सही, वो भी सही,
वरदान नही मांगूंंगा, हो कुछ पर हार नही मानूंंगा
-अटल बिहारी वाजपेयी
Share your comments