Manikrao Gavit: माजी केंद्रीय मंत्री आणि नंदुरबारचे माजी खासदार माणिकराव गावित यांचे निधन झाले. नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते.
आज सकाळी ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांचे पुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन त्यांच्या निधनाची बातमी दिली. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला दाखवली मोठी स्वप्नं; विविध घोषणा..
माणिकराव गावित यांचा जीवनप्रवास
१. नंदुरबार जिल्ह्यातील धुडीपाडा येथे माणिकराव गावित यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९३४ ला झाला.
२. माणिकरावांनी १९६५ मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा केला.
३. माणिकराव गावित हे नंदुरबार जिल्ह्यातील सलग ३० वर्षे खासदार राहिलेले पहिले नेते आहेत.
४. सलग ९ वेळा लोकसभेवर निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे.
५. १९८० च्या लोकसभा निवडणुकीपासून ते २००९ पर्यंत ते नंदुरबारचे खासदार राहिले.
भारीच की! फक्त 100 रुपयांत आजोबा आणि पंजोबाच्या काळातील जमीन करा नावावर; जाणून घ्या...
६. केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री अशी पदं न मागताच मिळाली.
७. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले होते.
८. माणिकराव गावित यांना मनमोहन सिंग यांचे सरकार आल्यावर पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं.
९. विशेष म्हणजे आपल्याला मंत्रिपद मिळाल्याचं त्यांना टीव्हीवरून कळालं होतं.
१०. माणिकराव गावित दहाव्यांदा विजयी झाले असते, तर लोकशाहीप्रधान देशात सलग दहा वेळा संसदेचे सदस्य म्हणून निवडून येण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावे जमा झाला असता, परंतु मोदी लाटेत त्यांना पराभवाचा धक्का बसला आणि वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मान हुकला.
यंदा शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! खात्यात जमा होणार 50 हजार रुपये अनुदान; हे शेतकरी असणार पात्र
Share your comments