मुंबई : राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. मनी लॉडरिंग प्रकरणी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 11 महिने 2 दिवसांच्या कोठडीनंतर अखेर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे.
2 नोव्हेंबर 2021 ला देशमुख यांना ईडीने अटक केली होती. आता आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना जामीन मंजूर केला आहे.
सचिन वाझे याने केलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपाखाली, तसेच मनी लॉंड्रिग प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर ईडी आणि सीबीआयने गुन्हा दाखल करत अटक केली होती. त्यानंतर सातत्याने त्यांचा जामीनाचा अर्ज फेटाळला जात होता.३
अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या नागपुरातील घरी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्यमेव जयते असं म्हणत या निर्णयाचे स्वागत केलं आहे. आम्हच्या इतर नेत्यांसाठी लढत राहू असंही त्या म्हणाल्या.
अनिल देशमुख यांना ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये हा जामीन मिळाला असून अजून सीबीआयकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आता सीबीआयकडूनही त्यांना जामीन मिळणार का हे पाहावं लागेल. त्यामुळे अनिल देशमुख यांची लगेचच तुरुंगातून सुटका होणार नाही हे स्पष्ट आहे. त्यांना सध्यातरी आर्थर रोड तुरुंगातच राहावं लागेल.
Share your comments