शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी मोठी घोषणा केली आहे.
आम्ही सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना 2 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणाच त्यांनी केली आहे. यामुळे याकडे यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एचडी कुमारस्वामी म्हणाले की, सध्या मुली शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करण्यास तयार नाहीत.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाला प्रोत्साहन देण्यासाठी मुलींना दोन लाख रुपये दिले जातील. जी मुलगी शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करेल अशा मुलींना 2 लाखांचे बक्षीस देणारी योजना आणली जाईल. यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. असेही म्हटले जात आहे.
एका तासात झालं होत्याच नव्हतं! एका तासात 25 लाखांचं नुकसान, शेतकऱ्यानं सांगितला थरार
शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या तरुणांसाठी हा एक चांगला निर्णय ठरेल, असेही कुमार स्वामी यावेळी म्हणाले. यामुळे आता सत्ता कोणाची येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या 10 मे रोजी होत आहे. तर या निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी लागणार आहे.
मधमाशीच्या डंकाची किंमत 70 लाख रुपये किलोपर्यंत, आता शेतकरी होणार मालामाल..
यासाठी सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपचे मुंबईतले नेते मैदानात उतरवण्यात आले आहे. भाजपने मुंबईतल्या तीन नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजप आमदार प्रसाद लाड आणि योगेश सागर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या पिकाचे तेल 20 हजार रुपये प्रति लिटर, दर चार महिन्यांत 1 लाखाची कमाई..
पोल्ट्री मधल्या तब्बल 13 हजार कोंबड्या अवकाळीच्या फेऱ्यात मृत्यूमुखी, क्षणात झालं होत्याच नव्हतं..
मुंबई डेंजर झोनमध्ये, महाराष्ट्रात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू..
Share your comments