मुंबई: राज्याच्या राजकारणामध्ये आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा बडा नेता आणि माजी मंत्री शिंदे सरकारच्या कॅबिनेटमध्ये जाणार असल्याच्या माहिती सूत्रांकडून समजत आहे.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नवा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यानंतर आता त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने सत्तांतरानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या अंदाज लावला जात आहे.
ज्येष्ठ नेत्यासोबत काँग्रेसचे 9 आमदार फुटणार असल्याची माहिती समजत आहे. शिवसेनेनंतर आता काँग्रेसमधीलही एक गट फुटून शिंदे सरकारमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे.
दिवाळीच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे काँग्रेस गटामधील बंडखोर आमदारांची मंत्रिपदावर वर्णी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काँग्रेसमध्ये असलेली धुसफूस गेल्या अनेक दिवसांपासून उघडपणे दिसत होती. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेसची 6 मतं फुटल्याचं समोर आलं होतं.
Share your comments