केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. गेल्या शनिवारी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी पार पडली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी नगर कृषी कायदे मागे घ्यावे या आपल्या भूमिकेचे समर्थन करत जवळपास मौनव्रत धारण केलं. शेतकरी प्रतिनिधींचा म्हणणं होतं की, सरकारने हे कायदे मागे घेणार की नाही याचे उत्तर केवळ होय की नाही या शब्दात द्यावा अशी भूमिका शेतकरी प्रतिनिधी घेतले होते.
पंजाब किसान युनियनचे नेते रु लदू सिंह यांनी सांगितले की, किसान युनियनच्या नेत्यांनी मौनव्रत धारण केले. सरकार हे कायदे मागे घेणार की नाही याबद्दल सरळ उत्तर देत नाहीत. पंजाब किसान युनियनचे कायदेशीर सल्लागार गुर लाभ सिंह महल यांनी सांगितले की, सरकार या कायदे मागे घेण्याच्या बाबतीत होय किंवा नाही या शब्दात उत्तर अपेक्षित आहे.
हेही वाचा :राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे आज साधणार राज्यातील रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी संवाद
हे आंदोलन सलग दहा ते बारा दिवस सुरू असतानाही सरकारला त्याची पर्वा नाही, सरकारला कोणताही तोडगा काढायचा नाही असं शेतकऱ्यांच्या नेत्यांचं झाल्याचंही काहींनी सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता मौनव्रत धारण केल्याचे सांगितले जाते. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चालले आहे. आंदोलन आता फक्त दिल्ली पुरते मर्यादित नसून देशभरातील शेतकरी यात सहभागी होतील आणि आपल्या पद्धतीने प्रश्न सोडतील. त्यामुळे सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 9 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता भेट घेणार आहेत. शरद पवार राष्ट्रपतीची कृषी कायद्याची चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार मैदानात उतरले आहेत.
Share your comments