1. बातम्या

मे आणि जूनचे वीजबिल माफ करा, अन्यथा ... : राजू शेट्टी

पुणे : टाळेबंदीमुळे अगोदरच जायबंदी झालेल्या शेतकऱ्यांवर वीजबिलाने पून्हा एकदा आघात केला आहे, त्यामुळे सरकारने मे आणि जूनचे वीजबिल माफ करावे नाहीतर कठोर आंदोलन करून सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

KJ Staff
KJ Staff

पुणे :  टाळेबंदीमुळे अगोदरच जायबंदी झालेल्या शेतकऱ्यांवर वीजबिलाने पून्हा एकदा आघात केला आहे, त्यामुळे सरकारने  मे आणि जूनचे वीजबिल माफ करावे नाहीतर कठोर आंदोलन करून सरकारला निर्णय  घ्यायला भाग पाडू असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेतीची यांनी म्हटले आहे.

एप्रिल, मे आणि जून या महिन्यातील ग्राहकांचे विज बिल सरकारने भरावे आणि 100 युनिट पर्यंतचे सर्व ग्राहकांचे बिल माफ करावे, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय राज्यस्तरीय धरणे आंदोलन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाले. यावेळी शेट्टी बोलत होते.  संपूर्ण राज्यही शेतकरी कोलमडला आहे. हा केवळ  कोल्हापूर जिल्याचा प्रश्न नाही  तर संपूर्ण राज्याचा आहे.

मागच्या काही महिन्यांपासून महावितरण  लोकांचं  मनोरंजनाचा विषय झाला आहे. वीजबिल आणि  त्यावर सरकारने दिलेले स्पष्टीकरण लोकांच्या रोषाचा विषय होत आहे. कोरोनामुळे  सगळ्यांचे रोजगार बुडाले आहे. लोकांकडे पैसा  नाही. अशा काळात मनमानी पद्धतीने वीजबिलाची आकारणी केली गेली आहे. यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, जर सरकारने वीजबिल माफ  केले नाहीतर आक्रमक आंदोलन करण्यात येईल आणि आमचे आंदोलन हे अवाजवी  बीजबिल रद्द करायला भाग पाडेल.  आता स्वाभिमानी संघटन  अक्षप्रकारे आंदोलन करते हे  पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान ऊर्जामंत्र्यांच्या मते, देण्यात आलेली विजबिले ही योग्य आहेत. 

English Summary: Forgive May and June electricity bills: Raju Shetty Published on: 11 August 2020, 08:53 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters