1. बातम्या

राज्यातील वनपट्टेधारकांना मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


राज्यातील वनपट्टे धारकांनाही पीएम किसान योजनेचा लाभ आता लवकर मिळणार आहे. राज्याचे कृषी मंत्री  दादाजी भुसे यांनी निर्देश दिले आहेत. मालेगाव येथून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यस्तरीय कृषी विभागाचा आढावा  भुसे  यांनी घेतला, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेबाबत आढावा घेतांना यामध्ये पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना पुर्वलक्षी प्रभावाने लाभ मिळाला पाहिजे, यासाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांशी चर्चा करून पाठपुरावा करण्यात येईल. या योजनेच्या निकषामध्ये पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची योग्य पद्धतीने मांडणी केल्यास राज्यातील बहुतांश शेतकरी यामध्ये समाविष्ट होवू शकतात. वनपट्टे धारकांना देखील या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कृषी आयुक्तांनी आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले.

यासह प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ नंदुरबार सारख्या आदिवासी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशिलता बाळगावी. आदिवासी शेतकरी बांधव पी.एम.किसान मानधन योजनेपासून वंचित राहिल्यास हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही कृषीमंत्र्यांनी दिले आहेत.

कसा करणार योजनेसाठी अर्ज - योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता.  किंवा https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे आपण नोंदणी आणि अर्ज भरून आपली नोंदणी करु शकता.  याशिवाय तुम्ही राज्य सरकार द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पीएम - योजनेच्या नोडल अधिकाऱ्यासी संपर्क करु शकता. किंवा आपल्याजवळील सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आपला अर्ज करू शकता.

कसे पाहणार ऑनलाईन आपले नाव - यासाठी आपण pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जावे. आपण या योजनेसाठी अर्ज करु इच्छित आहात तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता.  दरम्यान सरकारने पंतप्रधान किसान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले आहेत. जर आपल्याला आपले नाव पाहायचे असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता.  या योजनेतील सर्व लाभार्थ्यांची यादी आपण येथे पाहू शकता. पंतप्रधान किसान सन्मान निधी २०२० ची यादी तपासण्यासाठी pmkisan.gov.in या लिंकवर आपल्याला जावे लागेल.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters