पुणे- राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यातच बंगाल उपसागराचा पश्चिम मध्य भाग व आंध्र प्रदेशाच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पाऊस वाढणार आहे. राज्यासह तामिळनाडू, तेलंगणासह, पद्दुचेरी, अंदमान, आंध्र प्रदशात पुढील ४ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्रात शनिवारी सकाळी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र गेल्या २४ तासात आणखी ओमानच्या दिशेने सरकले आहे. गुजरातमधील वेराळपासून ते ५९० किमी दूर गेले आहे. येत्या २४ तासात ते आणखी पश्चिमेला जाऊ त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
आज ठाणे, पालघर, रत्नागिरी, धुळे नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उद्या संपुर्ण राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी जळगाव, परभणी, हिंगोली वगळता राज्यात सर्वत्र तर गुरुवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि संपूर्ण विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्याता आहे.
Share your comments