भूजल पातळी वाढलेली असणे हे शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. परंतु सिंचनाच्या विविध पद्धती आल्यामुळे तसेच विहिरी आणि बोरवेल्स त्यांची संख्या वाढल्याने जमिनीचे भूजल पातळी कमालीची घटत चालली आहे.
त्यामुळे भविष्यकालीन त्रास होऊ नये यासाठी जमिनीचे भूजल पातळी वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबतचशेतामध्ये विविध सिंचन पद्धती वापरून पाण्याची बचत करता येणे शक्य आहे. परंतु आपण बऱ्याचदा म्हणतो भुजल पातळी खालावली किंवा उंचावली परंतु सहजासहजी हा एक अंदाज असतो.
परंतु अचूकपणे भूजलपातळी समजने खूप महत्त्वाचे असते. यासाठी गावाला भूजल पातळीची नोंद व्हावी यासाठी अमरावती जिल्ह्यातील एकूण 90 ग्रामपंचायतींमध्ये 90 पर्जन्यमापक यंत्र आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत पिझोमीटर साठी स्थळ निश्चित करण्यात आली असून या माध्यमातून तुम्हाला तुमच्या गावाची भूजल पातळीची नोंद अवघ्या बारा तासाला घेता येणार आहे अशी सुविधा यामध्ये उपलब्ध होणार आहे.
तसेच 90 पर्जन्यमापक यंत्र येणार आहेत. अटल भूजल योजनेच्या माध्यमातून वरिष्ठ भूवैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत गावातील भूजल पातळी चा अभ्यास करण्यासाठी पिझोमीटर बसविण्यात आली असून शनिवारी या पिझो मीटर चे उद्घाटन राज्याचे महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पार पडले.
या उद्घाटन प्रसंगी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रादेशिक उपसंचालक संजय कराड,मोर्शी चे तहसीलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी आर पवारआणि वरिष्ठ भूवैज्ञानिक हिमा जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड,मोर्शी आणि चांदूरबाजार या तालुक्यात एकूण 90 ग्रामपंचायतींमध्ये हे पिझोमीटर बसवण्यात येणार आहेत.
जमिनीत भूशास्त्रीय रचनेनुसार जलधारक खडकाचा तसेच भूजल पातळी चा अभ्यास अत्याधुनिक पद्धतीने करण्यासाठी पिझोमीटरने खोदकाम करता येणार आहे.त्यावर डिजिटल वाटर लेवल रेकॉर्डर बसवण्यात येणार आहे.
पर्जन्यमापक यंत्र व भूजल मापक यंत्र अर्थात पिझोमीटर यंत्राचा उपयोग करून गावाचा ताळेबंद अधिक अचूकतेने करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:Breaking News: मान्सूनचं केरळ मध्ये झालं दणक्यात आगमन; 'या' तारखेला महाराष्ट्रात धडकणार
Share your comments