हरियाणा सरकार मे शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे.या योजनेच्या माध्यमातून बॅटरी चलित स्प्रेयर पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्क्यांची सूट दिली जाणार आहे.यासाठी शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
या योजनेत सगळ्यात महत्त्वाची अट अशी आहे की, या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी हा अनुसूचित जातीतील असायला हवा. हरियाणा सरकारच्या कृषी आणि किसान कल्याण विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नुसार वर्ष 2021ते22 मध्ये अनुसूचित जाती साठी असणाऱ्या या योजनेद्वारे शेतकऱ्यांना बॅटरीच्या स्प्रेपंप अनुदानावर दिला जाईल. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठीचे अर्ज के हरियाणा कृषी विभागाच्या वेबसाईटवर करता येते. या योजनेद्वारे लाभार्थ्यांची निवड ही जे सगळ्यात अगोदर येतील त्यांना प्राधान्य या आधारावर करण्यात येणार आहे.
या योजनेचा फायदा कोणाला मिळेल?
हरियाणा कृषी तसेच शेतकरी कल्याण विभागाच्या द्वारे सांगण्यात आले आहे की या योजनेचा लाभ हा जे शेतकरी वर्ष 2021 आणि 22 मध्ये अनुसूचित जातीच्या यादीत असतील त्यांनाच मिळणार आहे. यासाठी अशा शेतकऱ्यां जवळा अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.तसेच तो संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असावा.तसेच या अगोदर बॅटरी चलित स्प्रेयर पंप साठी अनुदान घेतलेला नसावा. बॅटरी चलीत स्प्रे पंपावर 50% किंवा दोन हजार पाचशे रुपये यापेक्षा जे कमी असेल तेवढ्या अनुदान मिळेल.
योजनेच्या माहितीसाठी असलेली टोल फ्री क्रमांक
या योजने विषयी अधिक माहिती साठी संबंधित जिल्ह्याच्या संबंधित कृषी उपनिदेशक किंवा सहाय्यक कृषी अभियंता यांच्या कार्यालय संपर्क करू शकता. याशिवाय टोल फ्री नंबर 18001802117/0172-2521900 वर संपर्क साधू शकता.
शेतकऱ्यांना मिळेल सवलत
सामान्य शेतकऱ्यांसाठी कृषी यंत्रांवर सूट मिळावी यासाठी हरियाणा सरकार विविध प्रकारच्या योजना चालवित आहे. यामध्ये मायक्रो इरिगेशन च्या संबंधित योजना जास्त आहेत कारण कमी पाण्यात पिकांना सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरीत करणे हा त्या मागचा उद्देश आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
Share your comments