सध्या नैसर्गिक शेती ही काळाची गरज बनली आहे. सध्या भारतामध्ये बरेच शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळताहेत.परंतु ही संख्या हवे तेवढे नाही म्हणूननैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा तसेच त्यासंबंधीच्या पायाभूत गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी त्यामुळे देशभरात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारल्या जाणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले
गुजरात मधील आनंद येथे झालेल्या नैसर्गिक शेती संबंधित जनजागृती कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.
प्रयोगशाळांचा असा होणार फायदा
शेतजमिनीच्या आरोग्य सुधारावे व उत्पादन क्षमता वाढावी यासाठी कोण कोणत्या गोष्टी आणि घटकांचा वापर करणे आवश्यक आहे, यासंबंधीची अचूक माहिती या प्रयोगशाळेच्या माध्यमातून होणार आहे.
त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने नैसर्गिक शेती करण्यासाठी या प्रयोगशाळांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. या प्रयोगशाळांमध्ये पाण्याचे नमुने, मातीचे परीक्षण तसेच उत्पादनात झालेल्या पिकांचे मूल्यमापन त्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहेत.
शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ मिळावा हा केंद्र सरकारचा उद्देश..
भारत हा कृषीप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.अगदी आपण पाहिले की कोरोना परिस्थिती देखीलकृषी क्षेत्रामुळे देशाचा जीडीपी टिकून राहिला होता.त्यामुळे हे क्षेत्र अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटक असूनत्यादृष्टीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.
त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून वेगळ्या प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. या योजनांच्या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना थेट मिळावा म्हणून त्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. सरकारने योजनांमध्ये तत्परता आणि प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ मिळावा हाच केंद्र सरकारचा उद्देश असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
Share your comments