1. बातम्या

पीएमएफएमई योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावे-कृषीमंत्री दादाजी भुसे

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना असून या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र हा संपूर्ण देशात प्रथम स्थानी आहे.या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजनबद्ध प्रयत्न करण्याच्या सूचना राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
dada bhuse

dada bhuse

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना असून या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र हा संपूर्ण देशात प्रथम स्थानी आहे.या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजनबद्ध प्रयत्न करण्याच्या सूचना  राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत

जर आतापर्यंत या योजनेचा विचार केला तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडे शेतकऱ्यांकडून 7556 अर्ज प्राप्त झाले आहे.या एकूण प्रकरणांपैकी बँकेकडे 2230 इतकी प्रकरणे सादर करण्यात आली आहे.या एकूण  सादर प्रकरणांपैकी 235 प्रकरणे बँकेने मंजूर केलेली आहेत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून मिळालेले 65 कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या  अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर असून सोबतच एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत निवडलेली उत्पादने तसेच जी आय मानांकन मिळालेली पिके व उत्पादनांची मूल्य साखळी बळकट करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे  यांनी सांगितले.

या योजनेचा उद्देश

 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकवला जाणारा कच्च्या मालावर प्रक्रिया करून अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ बनवले जातात. जसे की नाशवंत शेतीमालजसे की फळे व भाजीपाला, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, मत्स्योत्पादन,दुग्ध व पशु उत्पादन इत्यादी. यासाठी कोणत्याही मोठ्या कंपनीची किंवा एखादा मोठा युनिट उभारण्याची  गरज नसते. एक साधारण शिकलेला माणूस देखील हा व्यवसाय करू शकतो. अगदी  शेतकरी व शेतकऱ्यांची मुले देखील या योजनेद्वारे व्यवसाय मध्ये महत्वपूर्ण सहभाग नोंदवू शकतात व चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतात जेणेकरून त्यांची आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होते. 

हाच विचार लक्षात घेऊन देशातील केंद्र शासनाने ही योजना अमलात आणली आहे.या देशांमध्ये शेतकरीच नव्हे तर असे अनेक तरुण-तरुणी आहेत जे शिक्षण असूनही बेरोजगार आहेत. त्यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे सुरू करण्यात आली आहे.

English Summary: for prime minister micro processing industries scheme reach at every farmer so get effort Published on: 17 February 2022, 12:31 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters