सध्या शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान वापरले जात आहे. उच्च तंत्रज्ञान शेती मध्ये सध्या येऊ घातली आहे. अशाच एका तंत्रज्ञानाचा वापर काश्मीरमध्ये शेतकऱ्यांनी सफरचंदाची प्रतवारी आणि दर्जा चांगला ठेवण्यासाठी केला आहे.
काश्मीरमधील शेतकऱ्यांनी सफरचंदाची प्रतवारी उत्तम ठेवण्यासाठी नियंत्रित तापमान कक्ष अर्थात कंट्रोल्डॲटमॉसफियरटेक्नॉलॉजी चेंबरचा वापर केला आहे. सध्या या नियंत्रित तापमान कक्षात ठेवण्यात आलेली काश्मीरमधील सफरचंदे बाजारात दाखल झाले आहेत. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे सफरचंदाचा हंगाम संपल्यावर देखील या तंत्रज्ञानाद्वारे साठवलेले सफरचंद देशभरातील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत. काश्मीर मधील सफरचंदाच्या हंगामाचा विचार केला तर तो सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होतो व नोव्हेंबरमध्ये संपतो. तसेच नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये काश्मीरमध्ये मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होते तेव्हा तेथील शेतकरी सफरचंद घरात साठवून ठेवतात. तेथील वातावरण थंड असल्यामुळे सफरचंदाच्या दर्जावर एवढा परिणाम होत नाही. परंतु या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे सफरचंदाचा हंगाम जरी संपला तरी साठवलेले सफरचंद बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करता येतात.
अशा पद्धतीने झाली काश्मीरी शेतकऱ्यांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुरुवात…
साधारणतः सीए अर्थात( नियंत्रित तापमान कक्ष ) तंत्रज्ञानावर आधारित कक्षाची उभारणी करण्यास दोन-तीन वर्ष अगोदर सुरुवात झाली. अगदी सुरुवातीला येथील शेतकरी या तंत्रज्ञानासाठी एवढे उत्सुक नव्हते. त्यामुळे जम्मू-काश्मीर प्रशासनाने काश्मीर घाटी फ्रूट ग्रॉवरस असोसिएशन च्या मदतीने सीए तंत्रज्ञानावर आधारित कक्षामध्ये सफरचंद ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त केले. व कालांतराने शेतकऱ्यांचा कल याबाबतीत वाढत गेला. सध्या बाजारपेठांमध्ये या तंत्रज्ञानावर आधारित सफरचंदाची आवक सुरू झाली असून अगदी ताज्या सफरचंदा प्रमाणे या सफरचंदाची चव आहे.
काय आहे नेमके हे तंत्रज्ञान?
या टेक्नॉलॉजीच्या आधारे उभारण्यात आलेल्या कक्षांमध्ये तापमान नियंत्रित केले जाते. काढणी केलेले सफरचंद चोवीस तासाच्या आत मध्ये या कक्षात ठेवण्यात येतात.या कक्षामध्ये सफरचंद ठेवल्यामुळे ती लवकर पिकत नाहीत व त्यांच्यादर्जा वरही प्रतिकूल परिणाम होत नाही.जेव्हा हा कक्ष उघडण्यात येतो तेव्हा सर्व फळे बाजारात विक्रीसाठी पाठवावी लागतात. सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हंगाम संपल्यानंतर बाजारातील कमी आवकेचा फायदा शेतकऱ्यांना घेता येतो.
Share your comments