शेतकऱ्यांचे शेतीचे उत्पन्न वाढावे व तसेच मातीचा पोत सुधारावा यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपले शेती क्षेत्रठिबकसिंचनाखाली आणणे आवश्यक आहे.
जे शेतकरी मागणी करतील अशा प्रत्येक शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन यंत्रणा दिली जाईल,असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले. किन्हई येथे भुसेयांच्या हस्ते पीक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांना बरोबर घेऊनकृषी विभागात एक नवीन कक्ष कार्यान्वित करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून महिला बचत गट तसेच शेतकरी गटयांनाशासनाच्या कृषी विभागातर्फे आवश्यक ती मदत केली जाईल. तसेच महिला शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या 30 टक्के योजना आहेत त्याचाही महिला शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
कोरोना महामारी च्या संकटात सुद्धा सगळे उद्योग धंद्यांचे चाके जागेवर थांबली असताना देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याचे काम शेती क्षेत्राने केले.
त्यामध्ये शेतकऱ्यांचा फार मोठा वाटाआहे. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या वेगळ्या प्रकारचे योजना असून त्या प्रत्येक योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी जे जे शक्य आहे ते शासनाकडून केले जाईल अशी ग्वाही देखील यावेळी कृषीमंत्री भुसे यांनी दिली.
Share your comments