खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात जोरदार तयारी केली मात्र रब्बी हंगामात सुद्धा अनेक संकटे आली त्यामुळे आता जे शेतात पेरले आहे ते तरी उगवून येईल का अशी परिस्थिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे. रब्बी हंगामाचा पेरा होताच अवकाळी पाऊसाने हजेरी लावली त्यामुळे पीक वाढुनच दिले नाही. हे अवकाळीचे संकट कमी तो पर्यंत मराठवाडामध्ये ढगाळ वातावरण व धुके पडले असल्याने ज्वारी, गहू तसेच हरभरा च्या पिकाची वाढ खुंटलेली आहे.
काय आहे कृषीतज्ञांचा सल्ला?
जो पर्यंत वातावरण कोरडे होत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांना पिकाचे व्यवस्थापन करता येणार नाही तसेच आता जर फवारणी केली तर नुकसान होणार आहे. तुमचा वेळ व पैसा दोन्ही वाया जाणार आहेत. शेतकऱ्यांना फवारणी करायची असेल तर कोरडे वातावरण जे की चांगले ऊन पडल्याशिवाय फवारणी करता येणार नाही. मात्र कोरडे वातावरण झाले की ५ मिली ॲझाडिरॅक्टिन प्रति लिटर पाण्यात, एचएएनपीव्ही 500 एलई किंवा क्विनॉलफॉस 2 मि.लि पाण्यामध्ये मिसळून तुम्हाला फवारणी करावी लागणार आहे.
हरभरा फुलोऱ्यात मात्र, घाटी अळीचा प्रादुर्भाव :-
यंदा रब्बी हंगामात हरभरा पिकाने मुख्य पिकाची जागा घेतलेली आहे जे की पोषक वातावरण आणि कृषी विभागाकडून करण्यात आलेला बियाणांचा पुरवठा त्यामुळे हरभराच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झालेली आहे. मात्र अचानकपणे या वातावरण बदलामुळे हरभरा पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या वाढत्या प्रदुर्भावामुळे हरभरा पिकाचे उत्पादन घटले आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्यामुळे याचा उत्पादनावर परिणाम होतो की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
लातूर, नांदेडमध्ये धुक्याची चादर :-
यंदा रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या उशिरा झाल्या मात्र पिके जोमात होती. पण अचानक या वातावरणात झालेल्या बदलाचा सामना आता शेतकऱ्यांना करावा लागत आहे. थंड वातावरण असल्याने रब्बी हंगामातील पिके जोरात वाढत होती मात्र अतिथंडी असल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पडत आहे याची परिस्थिती मराठवाड्यात पाहायला भेटत आहे. जे शेतात पेरले आहे त्यावर जास्त खर्च जातोय आणि उत्पन्न कमी निघतेय असे चित्र आता पाहायला भेटत आहे.
Share your comments