1. बातम्या

कृषी मालाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा चांगला भाव आपोआपच मिळेल :नरेंद्रसिंग तोमर

शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी कृषी उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे,एका अधिकृत निवेदनानुसार, येथील ICAR सोसायटीच्या 93 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंत्री बोलत होते.तोमर म्हणाले की, मोदी सरकार भारतीय शेतीच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच देशातील शेतकरी आणि शास्त्रज्ञांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे, असे ते म्हणाले.

किरण भेकणे
किरण भेकणे
Narendrasingh Tomar

Narendrasingh Tomar

शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी कृषी उत्पादनांची गुणवत्ता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे,एका अधिकृत निवेदनानुसार, येथील ICAR सोसायटीच्या 93 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंत्री बोलत होते.तोमर म्हणाले की, मोदी सरकार भारतीय शेतीच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच देशातील शेतकरी आणि शास्त्रज्ञांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे, असे ते म्हणाले.

भारतातून कृषी उत्पादनांच्या निर्यातीत सातत्याने वाढ :

कृषी उत्पादनांच्या चांगल्या गुणवत्तेची खात्री करणे ही नेहमीच मुख्य चिंता राहिली आहे, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.तोमर यांनी देशातील अन्न आणि पोषण सुरक्षा निर्माण करण्यासाठी ICAR ने संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाद्वारे बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला.अन्नधान्य आणि फळांचे विक्रमी उत्पादन होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आणि याची मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात निर्यात होणार .

अनेक कृषी उत्पादनांच्या बाबतीत, भारत जगात पहिल्या , दुसऱ्या क्रमांकावर नेहमी अग्रमान्य आहे आणि आम्ही आमच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि विश्‍वासार्ह ब्रँड म्हणून विश्‍वासार्हता प्रस्थापित करण्याचे आमचे ध्येय आहे,” तोमर म्हणाले.शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा यासाठी गुणवत्ता महत्त्वाची असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले.त्यांनी परिषदेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या शताब्दी सोहळ्याची (वर्ष - 2029) तयारी सुरू करण्याचे आवाहन केले.तोमर म्हणाले की, मंत्रालय डिजिटल कृषी मिशन पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च कमी होईल.

तसेच डिजिटल कृषी मिशन २०२१-२०२५ चे उद्दिष्ट एआय, ब्लॉक चेन, रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस तंत्रज्ञान आणि ड्रोन आणि रोबोट्सच्या वापरासारख्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांना समर्थन आणि गती देणे हे आहे.

English Summary: Focus on quality of agricultural commodities. Good prices will come automatically: Narendrasingh Tomar Published on: 28 March 2022, 11:48 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters