महाराष्ट्रात अवकाळी मुळे खुप मोठे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांचे तर या बेमौसमी पावसामुळे लाखोंचे नुकसान झालेच आहे याशिवाय पशुपालक शेतकऱ्यांचे आणि मेंढपाळ करणाऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे राज्य सरकार आता पशुपालक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऍकशन मोड मध्ये आले आहे. महाराष्ट्र राज्याचे पशुपालन आणि डेअरी विकास मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितलं की, अवकाळी मुळे पशुपालक शेतकऱ्यांना झालेल्या हाणीसाठी नुकसान भरपाई दिली जाईल.
नुकतेच राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती आणि या अवकाळीमुळे राज्याच्या बऱ्याचशा भागात थंडीने हाहाकार माजवला होता, त्यामुळे राज्यातील पशुधनाचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील जवळपास 5000 पशु दगावले आहेत, यामध्ये बकरी, मेंढी, गाई, म्हशी या जनावरांचा समावेश आहे. ह्या घटनेचे नुकतेच पंचनामे करण्यात आले आहेत, आणि हा आकडा अजून वाढू शकतो अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
अशी केली जाईल मदत
राज्यात डिसेंबर च्या सुरवातीला अवकाळी पाऊस झाला, ह्या पावसात पाच हजार पेक्षा जास्त पशु मृत्यूमुखी पडलेत, यामध्ये मेंढ्याची संख्या जास्त असल्याचे सांगितले जात आहे. माननीय मंत्री महोदय यांनी सांगितलं की, झालेल्या नुकसाणीसाठी महाराष्ट्र शासन पशुपालकांना मदत करणार आहे, मृत्यूमुखी पडलेल्या एका शेळीसाठी/मेंढीसाठी चार हजार रुपये, गाईसाठी चाळीस हजार रुपये, बैलासाठी 30 हजार रुपये मदत शासनाकडून दिली जाणार आहे. माननीय राज्य मंत्री भरणे यांच्या मते घटनेचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत आणि लवकरच पशुपालक शेतकऱ्यांना मदत हि दिली जाईल.
राज्यात ह्या जिल्ह्यात सर्वात जास्त पशुधनाला झाली हानी
बारामती तालुक्यात माननीय राज्यमंत्री यांनी स्वतः जाऊन घटनेचे निरीक्षण केले, तेव्हा त्यांना अनेक मेंढपाळ लोकांनी आर्थिक मदतची मागणी केली. त्यानुसार मंत्री महोदयानी त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. पशुपालक शेतकरी व मेंढपाळ हे आता नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पशुपालकांना या अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला आहे. या तालुक्यातील 650 मेंढ्या, तसेच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात 366, शिरूर तालुक्यात 341, पुरंदर तालुक्यात 131
खेड तालुक्यात 84, हवेली 18, दौंड, मावळ तालुक्यात 24 मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. एकट्या बारामती तालुक्यातच 70 मेंढ्या मेल्याचे सांगितले जात आहे. या अवकाळीमुळे व बदलत्या हवामानामुळे पुणे जिल्ह्यात 600 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या 600 मेंढ्यापैकी 300 मेंढ्या एकट्या जुन्नर तालुक्यात जखमी झाल्या आहेत. ह्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते, असेही दत्तात्रेय भरणे यांनी स्पष्ट केले.
माहितीस्रोत:- टीव्ही9भारतवर्ष हिंदी
Share your comments