निती आयोगाचे मुख्य कार्यकारी संचालक अधिकारी (CEO) अमिताभ कांत यांनी बुधवारी आरोग्य सेतू ऐप्पविषयी माहिती दिली आहे. फक्त १३ दिवसात ५ कोटी लोकांनी हे ऐप डाऊनलोड केल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली. कोरोनाचा (corona virus) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन केले आहे. कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी सरकारकडून आरोग्य सेतू ऐप (Aarogya Setu App) लॉन्च करण्यात आले असून जास्तीत जास्त लोकांनी हे ऐप डाऊनलोड करावे, यासाठी आवाहन करण्यात येत आहे. कोरोना व्हायसरग्रस्त लोकांना ट्रॅकिंग करण्यासाठी या सेतू ऐपचा उपयोग होतो.
फेसबुकला टाकले मागे
कांत यांनी आपल्या ट्विटरवरुन ( Aarogya Setu App) ऐपविषयी ही माहिती दिली आहे. टेलीफोनला ५ कोटी लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ७५ वर्ष लागले. रेडिओला ३८ वर्ष लागलेत. तर टेलिव्हजनला १३ वर्ष, इंटरनेटला चार वर्ष, फेसबुकला १९ महिने लागले, पोकेमॉन गोला १९ दिवस लागले. मात्र कोरोना व्हायरसविरुद्धाच्या लढाईत काम करणाऱ्या ( Aarogya Setu App) आरोग्य सेतू ऐपला फक्त १३ दिवस लागले असल्याचे कांत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आरोग्य सेतू ऐप हे आपल्या जवळील कोरोनाग्रस्त रुग्णांचा अलर्ट देत असते.
जिल्हा प्रशासन, शैक्षणिक संस्थांना हे ऐप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले आहे. या ऐपचे लॉन्चिंग पंतप्रधान कार्यालयाद्वारे गठित करण्यात आलेल्या समितीद्वारे करण्यात आले आहे. यात निती आयोग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे सक्रिय भूमिका आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंसल्टेंसी सर्विसेज दुसऱ्या मुद्द्यांचे परीक्षण करत आहे. तर टेक महिंद्रा आणि महिंद्रा ग्रुप या ऐपच्या पुढील आवृत्तीवर काम करत आहे. सर्व मोबाईल्स फोनवर हे ऐप चालेल या पद्धतीची पुढील आवृत्ती असेल यावर टेक महिंद्रा काम करत आहे. सध्या हे ऐप फक्त स्मार्टफोनवर डाऊनलोड करता येते.
( Aarogya Setu App) चा असा करा वापर
Aarogya Setu App वापरण्यासाठी आपला फोन नंबर रजिस्टर करा.
फोन नंबर टाकल्यावर एक ओटीपी येईल. जो इंटर केल्यावर अपमध्ये रजिस्ट्रेशन होईल.
हे एक कोरोना व्हायरस ट्रॅकिंग ऐप आहे.
इंटर झाल्यानंतर App आपल्याला ब्लूटूथ आणि जीपीएस अॅक्सेस विचारते.
आपल्या डिव्हाईसमधून युझरचा डेटा अनक्रिप्टेड फॉर्ममध्ये घेतला जातो.
APP उघडल्यानंतर पर्सनल डिटेल्स विचारली जातात. यामध्ये जेंडर, नाव, वय, व्यवसाय आणि मागील 30 दिवसांच्या ट्रॅव्हल हिष्ट्रीबाबत विचारले जाते. अर्थात या माहितीला आपण स्कीप देखील करू शकतो.
यानंतर Appची भाषा निवडावी लागते.
APPमध्ये सर्व राज्यांमधील हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली आहे.
आपल्याला वाटल्यास आपण या संकटकाळात स्वतःला स्वयंसेवक म्हणून रजिस्टर करू शकता.
या APPमध्ये युझर आपले सेल्फ असेसमेंट करू शकतात.
काय आहेत खास फीचर्स
आरोग्य सेतु APPमध्ये दोन खास फीचर्स आहेत. यात राज्यवार कोविड-19 (covid-19) हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली आहे.
तसेच दुसरे म्हणजे सेल्फ असेसमेंट. या फिचरद्वारे आपण स्वतःची चाचणी करू शकतो. यातून तुम्हाला कोरोना धोका आहे की नाही हे लक्षात येण्यास मदत होते. जर तुमच्यामध्ये कोविड-19 (covid-19) ची काही लक्षणे असतील तर हे APP तुम्हाला सेल्फ आयसोलेशनसाठी निर्देश देतं.
महापालिकांना क्वॉरन्टाईन रुग्णांची माहिती घरबसल्या मिळणार. APP डाऊनलोड करताना काळजी घ्या गुगल प्ले स्टोरवर ‘AarogyaSetu’ असे टाईप करा. हे APP NIC (नॅशनल इन्फर्मेटिक सेंटर) ने बनवले आहे. प्ले स्टोरवर याच प्रकारचे काही बोगस APP देखील आहेत. त्यामुळे NIC ने पब्लिश केलेले APP घ्या.
Share your comments