भारताची सर्वात जास्त लोकसंख्या छोट्या शहरांमध्ये आणि छोट्या गावांमध्ये राहते. कोरोना महामारीच्या काळामध्ये बहुतेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे बहुसंख्य लोक बेरोजगार झाले, त्यांच्या कमाईचे साधन नाहीसे झाले. त्यामुळे बरेचसे लोकांनी शहराकडून गावांकडे स्थलांतर केले आहे. परंतु आता गावाकडे गेल्यानंतर सुद्धा जेव्हा आत्मनिर्भर बनतील तेव्हा ते आपल्या कुटुंबाचे पालनपोषण व्यवस्थित करू शकतील. त्यामुळे अशा काळात आपल्याला छोट्या छोट्या बिझनेस आयडिया कामात येतील. यातून आपण आपल्या स्वतःच्या गावांमध्ये आपल्या कमाईचा मार्ग उपलब्ध करू शकतो. या लेखामध्ये आपण असे छोटे पाच व्यवसायाविषयी माहिती घेणार आहोत.
किराणा दुकान
किराणा दुकान हा व्यवसाय छोट्या शहरांमध्ये तसेच अनेक गावांमध्ये सुरू करता येण्यासारखा सोपा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचे कमाई होऊ शकते, तसे पाहता कोरोना महामारीच्या काळामध्ये लोक गर्दीचे ठिकाणी म्हणजे शहरांमधून होणारा गर्दीच्या ठिकाणाहून स्वतःचा बचाव करू इच्छिता. अशा परिस्थितीत जर आपण किराणा दुकानाच्या माध्यमातून जर आपण चांगली सेवा आणि चांगल्या प्रतीचे प्रॉडक्ट ऑफर केले तर चांगल्या प्रकारचे नफा मिळू शकतो. जर आपल्याला शक्य असेल तर आपल्या दुकानावर आपण दूध, अंडे, ब्रेड आणि भाजीपाला ही विक्रीसाठी ठेवू शकतो. अशा वस्तूंच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळेल.
फुल शेती
जर आपण गावांमध्ये राहत असाल आणि आपल्या गावांमध्ये आपली स्वतःची शेती असेल. तर आपण त्यामध्ये फुलांची शेती करून चांगल्या प्रकारचा नफा मिळू शकतो. सध्याच्या काळात कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू सारखे राज्यांमध्ये फुलांची शेती करून मोठ्या प्रमाणात नफा कमावला जातो आणि मोठ्या प्रमाणात या राज्यांमधून फुलांची निर्यात केली जाते. उत्पादित फुलांना चांगली किंमत येण्यासाठी आपल्याला ती फुले शहरांमध्ये विकायला लागतील किंवा फुलांच्या निर्यातीचे संबंधित बिझनेस करणाऱ्यासोबत करार केला तर उत्तम फायदा मिळू शकतो.
पोल्ट्री फार्म/ मत्स्य व्यवसाय
पोल्ट्री फार्म आणि मच्छीपालन व्यवसाय करून आपल्या गावामध्ये आपण चांगली कमाई करू शकता. या व्यवसायात कमी वेळात चांगला नफा मिळू शकतो.
ट्युशन क्लास
कोरोना काळामध्ये सगळ्या भारतातील शाळा बंद आहेत. या काळामध्ये ऑनलाईन क्लासेसला महत्व दिले जात आहे. परंतु ऑनलाईन क्लासेस मधून पाहिजे तेवढा फायदा मिळताना दिसत नाही. त्यामुळे जर आपण आपल्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये आशा मुलांसोबत ओळख निर्माण करू शकता की ज्यांच्या येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांना काही स्पर्धा परीक्षांची तयारी करायची. अशा विद्यार्थ्यांची क्लासेस घेऊन चांगली कमाई करू शकता. परंतु त्याच्यासाठी आपल्याजवळ स्वतःचे चांगले शिक्षण आणि एखाद्या विषयात प्राविण्य असणे गरजेचे आहे.
कपड्याचे दुकान
देशामध्ये सगळ्यात जास्त चालणारा कोणता व्यवसाय असेल तो म्हणजे खाण्या-पिण्याचा म्हणजे एखादे रेस्टॉरंट किंवा कपड्यांचे दुकान. खाण्यापिण्यावर फार मोठा खर्च करतात तसाच तो खर्च कपड्यांवर सुद्धा करतात. अशामध्ये जर आपण आपल्या गावांमध्ये शहरांमध्ये डिझाईन आणि स्टाईलचे कपडे विक्रीसाठी ठेवले तर व्यवसायातून आपल्याला चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळू शकते.
Share your comments