1. बातम्या

सौर पॅनलशी संबंधित पाच व्यवसाय; दर महिन्याला होईल १ लाख रुपयांची कमाई

देशात सोलर क्षेत्र वाढत असून यातील उद्योगधंद्यांची संख्याही वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार सोलर व्यवसायासाठी खूप प्रोत्साहन देत आहे. जर आपल्याला याचा व्यवसाय करायचा असेल तर ही सुवर्ण संधी आहे. सोलर प्लांट म्हटलं की, आपल्याला डोळ्यासमोर फक्त विज निर्मिती आणि त्याची विक्रीचं चित्र येत असतं.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


देशात सोलर क्षेत्र वाढत असून यातील उद्योगधंद्यांची संख्याही वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार सोलर व्यवसायासाठी  खूप प्रोत्साहन देत आहे.जर आपल्याला याचा व्यवसाय करायचा असेल तर ही सुवर्ण संधी आहे. सोलर प्लांट म्हटलं की, आपल्याला डोळ्यासमोर फक्त विज निर्मिती आणि त्याची विक्रीचं चित्र येत असतं. परंतु सोलरशी संबंधित त्याशी जुडलेले अनेक व्यवसाय आहेत. आज आपण या लेखात याच व्यवसायांविषयी जाणून घेणार आहोत. 

एका महिन्यात करा एक लाख रुपयांची कमाई 

दरम्यान केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं लक्ष्य हे सोलर एनर्जीवर आहे.याच कारणामुळे सरकार लोकांही  सोलर प्लांट बसविण्यास प्रोत्साहन करत आहे.काही राज्यातील औद्योगिक क्षेत्रात सोलर प्लांट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर तुमच्याकडे  सोलर प्रोडक्ट्स विक्रीचा व्यवसाय करण्याची मोठी संधी आहे. यात सोलर पीवी, सोलर थर्मल सिस्टीम, सोलर एटिक फेन, सोलर कूलिंग सिस्टम चा व्यवसाय सुरू करु शकतात.सुरुवातीला साधरण ४ ते ५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. विशेष म्हणजे सोलर एनर्जी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियासह  इतर अनेक बँकांच्या एसएमई शाखेतून कर्ज मिळू शकते.आपण विचार करत असाल की, व्यवसायात गुंतवणूक अधिक आहे, पण या व्यवसायातून तुम्ही ३० हजार रुपयांपासून ते १  लाख रुपयांची कमाई दर महिन्याला करु शकतात.

सोलरद्वारे चालणारे प्रोडक्ट्सचा व्यवसायही आपण करू शकतात. या दिवसात अशी अनेक प्रोडक्ट्सची मागणी खूप आहे.देशातील आणि परदेशातील कंपन्या सोलर,मोबाईल चार्जर, सोलर वाटर हीटर,सोलर पंप,सोलर लाईट्स बनवत आहेत. यातील काही प्रोडक्ट्सवर वाटर हीटर, पंपसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सब्सिडीदेखील मिळते.

 


या व्यवसायासाला सुरू करण्यासाठी १ ते २ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही यासाठी बँकेतून कर्जही घेऊ शकतात.  या व्यवसायातून तुम्ही दर महिन्याला  २० ते ४० हजार रुपयांची कमाई करू शकतात.

सोलर मेंटेनेंस आणि क्लिनिंग सेंटर  -

सोलर एनर्जीशी संबंधित अजून एक व्यवसाय आहे.मेंटेनेंस आणि  क्लिनिंग आणि सेंटर सुरू करुन कमाई करू शकतात. आपण सोलर पॅनलची काळजी देखभाल जितकी अधिक घेतली तर तितकीच उत्पादन क्षमता अधिक होत असते. क्लिनिंग सेंटर सुरू करून सोलर पॅनल वापरणाऱ्यांना  किंवा इंडस्ट्रीजला सर्विस देऊ शकतात.पॅनल की मेंटेनेंससह सोलर प्रोडक्ट्स आणि इन्वर्टर्सची दुरुस्ती  आणि मेंटेनेंसची काम करू शकतात. यात गुंतवणूकही कमी आहे. साधारण ५० हजारल रुपयांची गुंतवणुकीची आवश्यकता या व्यवसायात आहे. तर दर महिन्याला तुम्ही यातून १५ ते २० रुपयांची कमाई करु शकतात.

सोलर कंसल्टेंट (सोलर सल्लागार)

सोलर एनर्जीमध्ये तुम्ही सोलर कंसल्टेंट म्हणून काम करू शकतात. सोलर कंसल्टेंट बनवण्याासाठी आपल्याला सोलर व्यवसायाची तांत्रिक माहिती घ्यावी लागेल. याचे काही कोर्सही असतात. सोलर प्लांट किंवा पॅनल लावणाऱ्यांची वायबिलिटी, फायदे, नुकसानाची माहिती  घ्यावी लागेल. जेणेकरून तुम्ही ग्राहकांना माहिती देऊ शकतात. सल्लागार किंवा कंसल्टेंटचं काम हे असतं की, सोलरच्या साईटवर जाऊन त्याचा अभ्यास करायाचा आणि  गुंतवणुकीचा सल्ला द्यायचा.यासाठी आपल्याकडे एक ऑफिस, संकेतस्थळ, (वेबसाईट) यासारखी काही प्राथमिक गोष्टी हव्यात. यात गुंतवणूक खूप कमी असते. पण कमाई मात्र ५० हजार दर महिन्याला करु शकतात. 

 


फायन्सास सल्लागार 

- जे ग्राहक सोलर प्रोजेक्ट्स किंवा पॅनल बसवू इच्छितात, त्यांना सेवा देण्याचे काम वित्त सल्लगार करत असतात. अनेक सरकारी आणि गैर सरकारी कंपन्या सोलर पॅनल  लावण्यासाठी आर्थिक मदत कर्ज उपलब्ध करुन देत असतात. परंतु याची माहिती सामान्य लोकांना नसते. तुम्ही याची सर्व माहिती घेऊन ग्राहकांना देत असतात. तुम्ही खासगी वित्त संस्थेशी संपर्क करुन ग्राहक आणि वित्त देणाऱ्या संस्थेच्या दरम्यान एक मध्यस्थ म्हणून काम करु शकतात. यातून तुम्ही  ३० ते ५० हजार रुपयांची कमाई करु शकतात.

 

English Summary: Five business related to solar panels will earn Rs 1 lakh per month Published on: 17 October 2020, 02:58 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters