Solapur News : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सरकारविरोधात मराठा समाजाकडून रोष व्यक्त होताना दिसत आहे. यातच आता राजीनामा सत्र सुरु झाले आहे. मराठा आरक्षणासाठी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांना राजीनामा दिला आहे. त्यापोठापाठ सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रांझणी भिमाशंकरच्या सरपंच चंचला विजय पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे, असं वृत्त मराठी वृत्तवाहिनेने दिले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सरपंच पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. रांझणी भिमानगर येथे साखळी उपोषणाला सुरूवात झाली आहे. त्यानंतर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
यावेळी कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहून पाटील यांनी ही घोषणा केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील महिला सरपंच पदाचा राजीनाम चंचला पाटील यांनी राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील २५ तारखेपासून पुन्हा आंदोलनाला बसले आहेत. यामुळे त्यांनी तब्येत पुन्हा खालावत चालली आहे. यावेळी आरोग्य सेविका त्यांच्या भेटीसाठी आल्या असता जरांगे पाटील यांना पाहून त्यांना अश्रू अनावर झालेत. यावेळी त्या म्हटल्या आहेत की, जरांगे पाटील यांना उपचारांची गरज असल्याचं म्हटलं. पण हे सांगत असतानाच त्या आरोग्यसेविकेला आपले अश्रू रोखता आले नाहीत. त्यांना रडू कोसळलं.
Share your comments