मुंबई
टोमॅटोच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयात करणार सुरुवात केली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे, असे वृत्त एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले आहे. नेपाळमधून टोमॅटो आयातीचा पहिला लॉट आज भारतात येणार आहे.
उत्तर भारतातील वाराणसी, लखनऊ आणि कानपूर शहरात टोमॅटो आयातीचा पहिला लॉट येणार आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
सध्या बाजारात टोमॅटोला १५० ते २०० किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातून टोमॅटो बऱ्यापैकी बाहेर गेला आहे. या सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आयातीचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
दरम्यान, दोन महिन्यांपासून टोमॅटोने चांगलाच दर गाठला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटोची देखील रातोरात चोरी होऊ लागली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढली आहे. काही शेतकऱ्यांनी चोरी टाळण्यासाठी शेतात सीसीटीव्ही देखील लावले आहेत.
Share your comments