औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज भागातील लिंबेजळगाव येथे उसाला आग लागल्याची घटना घडली आहे. एका लग्न समारंभात (Wedding Ceremony) करण्यात आलेल्या फटाक्यांच्या (Fireworks) आतिषबाजीमुळे ही आग (Fire) लागली असल्याचं समोर आले आहे. ज्यात एकूण पाच शेतकऱ्यांचा अंदाजे सहा लाखांचा ऊस जळून खाक झाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) प्रयत्नाने अखेर आग विझवण्यात यश आले. तर या आगीची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.लिंबेजळगाव शिवारातील शेतकरी चंद्रशेखर त्रिंबक आलोने, सुरेश त्रिंबक आलोने, अवंतिका त्रिंबक आलोने, दत्तात्रय हरिभाऊ आलोने, सुलेमान मोहम्मद खान या शेतकऱ्यांचा जवळपास दहा एकर क्षेत्रात ऊस लावलेला होता.
यातील काही ऊस तुटून कारखान्याला गेला होता. तर काही ऊस बेणे म्हणून लावण्यासाठी तसाच उभा होता. शेताजवळच मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयात रविवारी दुपारी लग्नाचा कार्यक्रम होता. वरात लग्न मंडपात येताच फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. यातील काही फटाके उडून ऊसात पडले होते.
कोरोना जवळ आला असताना डॉक्टर संपावर, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता
त्यानंतर ही आग लागली असा आरोप शेतकरी चंद्रशेखर आलो यांनी केला आहे. तलाठी विजय गिरबोणे यांनी या आगीचा पंचनामा केला. ज्यात पूर्ण वाढलेला उभा ऊस व ठिबकचे पाईप असे अंदाजे 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दारू मटण सोडून जळगावात नववर्षाच्या स्वागताला गोमूत्र प्राशनाची अनोखी पार्टी
दरम्यान, अग्निशमन दलाच्या दोन बंबच्या मदतीने अखेर आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झाले होते. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो जास्त उत्पन्न काढा, पण पत्रकारांना उत्पन्न सांगू नका, शरद पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला
३६० ट्रॅक्टर, ७० पोकलेन आणि डझनभर जेसीबी, फडतरीची झाली एक वेगळीच ओळख
मोलॅसिस विक्रीची रक्कम शेतकऱ्यांना द्या, प्रत्येक उपपदार्थांच्या विक्रीचा नफा शेतकऱ्यांना मिळणार, सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा
Share your comments