राज्यात सध्या पीक पद्धती मध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. लोक भुसार पिकांऐवजी आता ऊस कापूस, टोमॅटो(tomato),बटाटा या पिकांची लागण करून भरपूर उत्पन मिळवत आहेत. तसेच भुसार पिकांच्या तुलनेत या पिकांना कष्ट सुद्धा कमी लागते.सध्या सर्वत्र महागाई भरपूर प्रमाणात वाढली आहे. भाजीपाल्याचे तसेच धान्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टोमॅटो चे भाव वाढल्याने सर्वसामान्य लोकांच्या आहारातून टोमॅटो गायबच झाला आहे. असे म्हणायला हरकत नाही.
सरासरी दर ४ हजार २५० रुपये :
टोमॅटो भाव वाढीमागे अनेक वेगवेगळी कारणे आहेत त्यामध्ये टोमॅटो चे उत्पन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २०) उच्चांकी ६ हजार ३७५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर सरासरी दर ४ हजार २५० रुपये राहिला. बाजारात टोमॅटो च्या आवकेत अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळं मागणी च्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यामुळे टोमॅटो चे भाव आभाळभर वाढले आहेत. भाव वाढल्याने टोमॅटो ची लाली जास्तच खुलली आहे परंतु सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागली आहे.
हेही वाचा:मुळशी तालुक्यात इंद्रायणी भातासाठी दर्जदार बियाणे उपलब्ध,का आहे जगभरात मागणी वाचा सविस्तर
मे महिन्यात राज्यात उन्हाचा कडकडाट असल्यामुळे झाडे सुकून जाणे तसेच उन्हामुळे फुलकळी गळणे तसेच फळमशी आणि रोगराई यामुळे टोमॅटो चे उत्पन्न घटून दरामध्ये प्रचंड वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे एकूण लागवडीपैकी 70 टक्के उत्पादनात घट झालेली दिसून येते.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी टोमॅटो ला उच्चांकी ६ हजार ३७५ रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला होता दर. तर सरासरी भाव हा ४ हजार २५० रुपये राहिला.
गेल्या काही दिवसांमध्ये टोमॅटो ची आवक स्थिर होती, मात्र १७ मेनंतर बाजारात टोमॅटो ची आवक कमी झाल्याचे टोमॅटो चे भाव हे दुप्पट च वाढले. बाजारातील मागणीच्या तुलनेत टोमॅटो चा पुरवठा कमी होत असल्याने भावात दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून टोमॅटो च्या भावात कायम सुधारणा दिसून आली. सध्या बाजारात टोमॅटो चा 60 ते 80 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला यातून चांगला नफा मिळणार आहे परंतु उत्पादनात सुद्धा घट झाल्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी उत्पन्न त्यामधून निघत आहे.
उन्हाळ्यात दर तिसऱ्या दिवशी एकरी प्रतितोड्याला सरासरी १२०० क्रेट टोमॅटो चे उत्पन्न निघत होते परंतु साध्य हेच उत्पन्न निम्म्यावर आले आहे. आता केवळ ५०० ते ६०० क्रेटएवढेच उत्पादन मिळत आहे. दरात सुधारणा दिसून येत असली तरी अनेक उत्पादनावर परिणाम झाल्याने काहीशी नाराजी आहे. एकंदरीतच टोमॅटो दराचे गणित निसर्गावर अवलंबून आहे.येत्या काही दिवसात टोमॅटो चे भाव अजून वाढतील असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.
Share your comments