कोरोना सारखी महामारी किंवा अपघात त्यामुळे अचानक जास्त खर्चाचा बोजा येऊ शकतो. त्यामुळे अशा अचानक उद्भवणाऱ्या खर्चापासून संरक्षणासाठी कॅशलेस मेडिक्लेम इन्शुरन्स ला अनन्यसाधारण महत्व आहे. ग्रामीण भागाचा विचार केला तर कॅशलेस मेडिक्लेम बद्दल पुरेशी जनजागृती नाही.
त्यामुळे बरीचशी ग्रामीण लोकसंख्यादर्जेदार आशा आरोग्यसेवा पासून वंचित राहतात. ही परिस्थिती बदलायची असेल तर मायक्रो फायनान्स कंपन्या हे प्रभावीपणे करू शकता.मायक्रो फायनान्स कंपन्यांचे आपल्या ग्राहकांबरोबर वैयक्तिक नाते असते. त्यामुळे ते आपल्या ग्राहकांसोबत आणि ग्रामीण जनतेमध्ये कॅशलेस मेडिक्लेम बद्दल जनजागृती करू शकता.
मायक्रो फिन कंपनीनुसार घरातील एखादी स्त्री आपल्या संपूर्ण कुटुंबाचा विमा मायक्रो फी नचा कॅशलेस मेडिक्लेम इन्शुरन्स द्वारे केवळ महिन्याला शंभर रुपयांच्या प्रीमियम सह काढू शकता एका वर्षाच्या कालावधीसाठी 50 हजार रुपये किमतीचे उपचार मिळू शकतात.या कॅश फ्री मेडिक्लेम मध्ये कुटुंबातील पाच सदस्यांचा समावेश होतो. ज्यामध्ये 50 वर्षापर्यंतच्या कुटुंब सदस्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
एवढेच नाही तर या योजनेत हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या त्या कालावधीत वेतन संरक्षण म्हणून पाचशे रुपये दर दिवसाच्या हिशोबाने जास्तीत जास्त दहा दिवसांपर्यंत चे वेतन संरक्षण ग्राहकांना दिली जाते. बरेचदा रुग्णालयात भरती होण्याच्या अगोदर अनामत रक्कम भरण्यासाठी बऱ्याच प्रमाणात धावपळ करावी लागते. कंपनीच्या कॅशलेस मेडिक्लेम इन्शुरन्स मुळे ग्राहकांची धावपळ थांबते.
Share your comments