केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सभागृहात केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प म्हणजे कृषी सुधारणांच्या नावाखाली केवळ स्वप्नांचा मनोरा बांधला गेला आहे.
त्यासोबतच यंदाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये पाऊनटक्क्याने शेतीचे बजेट कापण्यात आली अशी निराशजनक प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. आजच्या अर्थसंकल्पावर राज्यभरातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. शेतकरी नेत्यांनी आजच्या बजेटवर नाराजी व्यक्त केली आहे. फक्त राजू शेट्टी म्हणाले की,शेती क्षेत्रामध्ये डिजिटल क्रांती करण्याची भाषा अर्थमंत्री करत आहेत. मात्र प्रत्यक्षात कृषी महाविद्यालयाचे अवस्था अत्यंत दयनीय आहे. फेसबुक आणि व्हाट्सअप वर गव्हाची शेती करता येत नाही. तसं इंस्टाग्रामवर द्राक्षाची शेती करता येत नाही.
2016 मध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. मात्र याउलट महागाईचा दर जास्त वाढला आहे. कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांवर अवलंबून असणारे उद्योगपतींचे उत्पन्न दुप्पट झाले आणि शेतकरी मात्र कर्जबाजारी झाला. शेतकऱ्यांचा सगळा माल हा हमी भावाने खरेदी करतात असे मंत्री सांगतात. अनेक ठिकाणी याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.या सर्वांना मी आठवण करून देतो की गेल्यावर्षी अर्थमंत्र्यांनी शेतीमाल खरेदी करण्यासाठी 2 लाख 47 हजारकोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र गेल्या वर्षी सर्व शेतीमाल सरकारने खरेदी केला नाही. पैसे खर्च झाले मात्र शेतकऱ्यांच्यामध्ये कुठे आनंद दिसला नाही. या वर्षीच्या अर्थसंकल्पात बजेट मध्ये दहा हजार कोटींचे कपात केली आहे.
मागच्या वर्षी एकूण बजेटच्या 4.36टक्के तरतूद शेतीसाठी होती मात्र यावर्षी ती 3.76 टक्के इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये शेतीचे बजेट पाउन टक्क्याने कापण्यात आले आहे. त्यामुळे या बजेट मध्ये काहीही स्वागत करण्यासारखं नाही.हा बजेट शेतकऱ्यांना निराश आणि खड्ड्यात घालणारा असल्याची तिखट प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.
Share your comments