भाजपने 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या शरद पवारांचा (Sharad Pawar) बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात दौरा केला.
भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन बारामती’ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रारंभ केला. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 21 सप्टेंबरला बारामती दौऱ्यावर आल्या होत्या. (Central government schemes)
आमदार भाऊ मानलं तुम्हाला! स्वखर्चातून संपूर्ण तालुक्यातील जनावरांचे केले लम्पी लसीकरण
निर्मला सीतारामन यांची रणनीती
केंद्र सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. यासाठी आता निर्मला सीतारामन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता केंद्र शासनाच्या विविध योजना आता थेट ग्रामपंचायत स्तरावर राबविण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला आहे.
बारामती (Baramati) दौर्यानंतर निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला हा पहिला मोठा दणका दिल्याचं मानले जात आहे. निर्मला सीतारामन तीन दिवसांसाठी बारामती दौऱ्यावर आल्या होत्या.
सरकार देणार 78 दिवसांचा बोनस, जाणून घ्या कोणाला होणार सर्वाधिक फायदा
यावेळी निर्मला सीतारामन यांनी परिवार सन्मान बैठक, संघटनात्मक तयारी आढावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक,मंडल आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या.
भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा, सुकाणू समिती पदाधिकारी बैठक, मोर्चा पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद, सहकारी आणि व्यापारी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक, महिला मोर्चा आणि युवक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
6 ऑक्टोबरपासून पुन्हा पावसाळा सुरू होणार; या भागात जोरदार पावसाची शक्यता
Share your comments