आनंद ढोणे
परभणी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद १० ऑक्टोबर २०२३ रोजी पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे पार पडली होती. परभणी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ह्या वर्षीच्या ऊसाला प्रति टन ३३०० रुपये पहिली उचल द्यावी, असे एक मताने ठरले होते. नंतर कारखाने सुरु झाले आणि साखर कारखान्यांनी २५०० रुपये पहिली उचल जाहीर केली होती. ती स्वाभीमानी शेतकरी संघटनेला मान्य नव्हती. त्यानंतर स्वाभिमानी व किसान सभा यांनी मिळून पाथरी तालुक्यातील लिंबा येथील योगेश्वरी साखर कारखान्यावर आंदोलन केल्यानंतर ऊस दराची कोंडी फुटली. त्यावेळी प्रतिटन २७०० रुपये दर देणार असल्याचे जाहीर कारखाने जाहिर केले.
२७०० रुपये भाव जाहीर
त्यानंतर G-७ शुगर, गंगाखेड शुगर साखर कारखान्यांनी २७०० रुपये दर जाहीर केला त्यानंतर श्री तुळजा भवानी शुगर, सेलू यांनी २०० रुपये वाढवत अंतिम दर २६०० रुपये जाहीर केला. परंतु दोन कारखाने मात्र दर द्यायला तयार नव्हते त्यात श्री लक्ष्मी नृसिंह शुगर आमडापुर, व ट्वेन्टीवन शुगर सायखेडा तेव्हा स्वाभिमानीचे अध्यक्ष मा.खा राजु शेट्टी यांच्या मार्गदर्शनात १७ जानेवारीला बेमुदत रास्ता रोको आंदोलन होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यात या दोन कारखान्यास आदेश देण्यात आले होते.
जिल्ह्यातील सात कारखान्या पैकी पाच कारखाने २७०० रुपये किंवा त्या पेक्षा अधिक दर देतात. मग तुम्ही द्यायला पाहिजे. जिल्हाधिकारी यांचे न जुमानता ह्यांनी दर वाढवले नाही. तेव्हा ठरल्याप्रमाणे आंदोलन शिंगणापूर फाटा येथे १७ जानेवारी २०२४ रोजी सुरु झाले. राजु शेट्टी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक काळे आणि कारखानदार यांच्यात चर्चा झाली. दोन तास चर्चा झाल्यानंतर कारखान्याने २७०० रुपये देण्याचे जाहीर केले.
राजू शेट्टी यांच्या सोबत फोन वरुन श्री लक्ष्मी नृसिंह शुगर कारखान्यांचे तिन्ही मालक प्रमोद जाधव, संजय धनकवडे व नागवडे यांनी संवाद साधला तसेच ट्वेन्टीवन शुगर चे व्हॉईस चेरमान विजय देशमुख यांनी सुधा संवाद साधत यावर्षी तुटणाऱ्या ऊसाला २७०० रुपये दर देण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलकांनी व शेतकऱ्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.
दरम्यान, या प्रसंगी,स्वाभीमानीचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे पाटी, दिपक लिपणे, रामप्रसाद गमे,गजानन तुरे, रामराजे महाडीक, प्रसाद गरुड, मुंजा भाऊ लोडे, पंडित भोसले, तानाजी भोसले, रुपेश शिंदे, शेख चाँद, विकास भोपळे, गजानन दुगाने, माऊली शिंदे, मयुर वाघमारे, नागेश दुधाटे, सचिन शिंदे सह आदी कार्यकर्ते व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share your comments