1. बातम्या

...अखेर 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालं अतिवृष्टीचं अनुदान; आतापर्यंत 238 कोटी मिळालेत, शिल्लक अनुदान रक्कम मात्र…

राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता, यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे खरिपातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले होते, यामुळे बळीराजा पुरता बेजार झाल्याचे चित्र बघायला मिळाले होते. नांदेड जिल्ह्यातही खरीप हंगामात अतिवृष्टीने हजेरी लावली होती त्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील सर्वच पिके मातीमोल झाली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता थोडासा दिलासा मिळणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Farmer

Farmer

राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता, यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे खरिपातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले होते, यामुळे बळीराजा पुरता बेजार झाल्याचे चित्र बघायला मिळाले होते. नांदेड जिल्ह्यातही खरीप हंगामात अतिवृष्टीने हजेरी लावली होती त्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील सर्वच पिके मातीमोल झाली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता थोडासा दिलासा मिळणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 238 कोटी रुपये अनुदान जारी करण्यात आले आहे. या अनुदानामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. खरीप हंगामात साधारणत मार्च ते सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने त्राहिमाम् माजवला होता या काळात जिल्ह्यातील 66 हजार 500 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळेच शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी 424 कोटी रुपयांचा अनुदान निधी जाहीर केला होता. त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा बँकेला 424 कोटी रुपये शासनाद्वारे देण्यात आले आहेत. या एकूण रकमेपैकी आत्तापर्यंत 238 कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र 45 दिवसात 238 कोटी रुपयाचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आगामी काही दिवसात अनुदानाची शिल्लक राहिलेली रक्कम देखील वितरीत केली जाणार असल्याचे समजत आहे. मायबाप सरकारच्या या अनुदानामुळे खरीप हंगामात झालेले नुकसान कदापि भरून निघणार नाही मात्र यामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासा मिळणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वात जास्त सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. या खरीप हंगामात देखील जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा लक्षणीय नजरेस पडला होता. मात्र सोयाबीन काढणीला आला असताचं झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोन्यासारखे पीक डोळ्यादेखत मातीमोल झाले. या अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली परिणामी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. सोयाबीन समवेतच जिल्ह्यात इतर सर्व खरीप पिकांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान केले होते.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसानीच्या मोबदल्यात शासनाकडूनमदतीची आशा होती. शेवटी थोडा उशीर का झाला असेना मात्र अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आले आहे. तसेच शिल्लक राहिलेले अनुदानाची रक्कम लवकरात लवकर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या दुःखात थोडी का होईना घट घडून येईल अशी आशा आहे.

English Summary: Finally, farmers in nanded district got excess rainfall subsidy; 238 crore so far, but the remaining grant amount is Published on: 01 February 2022, 11:11 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters