खरीप हंगामात जसे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले त्याप्रमाणे रब्बी हंगामातील सुद्धा पिकांची मालिका सुरू आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामना करावा लागत आहे. नांदेड जिल्ह्यात धुके पडले असल्याने हरभरा तसेच गहू पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे जे की गेलेला खर्च तरी माघारी येतोय की नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. मात्र आज सकाळी पासून सूर्यप्रकाशाचे दर्शन घडले असल्याने शेतकऱ्यांना अशी आशा आहे की पिके पुन्हा बहरून येतील कारण त्याप्रकारे पोषक वातावरण सकाळ पासून झाले आहे.
महिन्यानंतर झाले सूर्यदर्शन :-
मागील महिन्यापासून मराठवाड्यात ढगाळ वातावरण तर विदर्भात गारपीट चे वातावरण सुरू आहे त्यामुळे रब्बी हंगामातील गहू तसेच हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. गहू पिकावर तांबोरा रोग तर हरभरा पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. मागील पाच दिवसापासून थंडी वाढल्याने धुक्याचे प्रमाण वाढले त्यामुळे ज्वारी पिळवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला गेला. रब्बी हंगाम पूर्ण धोक्यात असतानाच मंगळवारी सकाळपासून ऊन पडले असल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शेतातील कामे चालू केली आहेत.
पाण्याचाही योग्य वापर :-
यंदा पिकांना मुबलक प्रमाणात पाणी आहे मात्र अनुकूल वातावरण तयार नसल्याने पिकांना नुकसानीला सामोरे जावे लागत होते. शेतकरी वातावरण नीट होण्याची वाट बघत होते जे की आज सकाळी पासून सूर्यप्रकाशाचे दर्शन घडल्यामुळे शेतकरी शेती कामाला लागले आहेत. ढगाळ वातावरण झाल्यामुळे पिकांवर मावा तसेच चिकटा सुद्धा वाढला होता त्यामुळे आता हे संकट पुन्हा येऊ नये असे शेतकरी म्हणत आहेत.
उत्पादन वाढवण्याची संधी :-
मागील अनेक दिवसांपासून नांदेड मध्ये ढगाळ वातावरण होते त्यामुळे मर रोगासह पिकांवर अळीचा प्रादुर्भाव पडला मात्र आजच्या पडलेल्या उन्हामुळे रोग नष्ट होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. कृषी विभागाने थोड्या प्रमाणात फवारणी करावी असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे तसेच पिकांच्या वाढीसाठी खताची मात्रा द्यावी असे सुद्धा कृषी तज्ञांनी सल्ला दिला आहे.
Share your comments