राज्यातील आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यामध्ये आता शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करा, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जाच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी संताप व्यक्त करत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या शेतकरी पिकाची तयारी करण्यासाठी कर्ज घेत आहेत.
यंदा राज्यात पावसाची स्थिती काय, मान्सून कधी येणार, पंजाबराव डख यांचा पहिला अंदाज आला समोर..
असे असताना मात्र सीबीलचा मुद्दा पुढे करत बँका शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारत आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी बैठकीत संताप व्यक्त करत शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या सुचना केली आहे.
राज्यात लम्पीचीही दुसरी लाट! शेतकरी चिंतेत, लसीकरण करून घेण्याचे आवाहन
शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांना झटका दिल्याशिवाय जमणार नाही. एकतरी एफआयआर दाखल करावा, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यामुळे आता तरी बँका कर्ज देणार का.? हे येणाऱ्या काळात समजेल.
पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांची कृषी जागरणाला भेट, म्हणाले, निसर्ग कधीही विश्वासघात करत नाही
आता स्वयंपाकघरातून पिवळी मसूर गायब होणार, किमती झपाट्याने वाढल्या
पिकांची मशागत सोडा, आता गांडुळाच्या शेतीतून लाखो रुपये कमवा, जाणून घ्या कसे..
Share your comments