रब्बी हंगामात येणारं महत्वाचं कंदमुळ म्हणजे गाजर. गाजरामध्ये बीटा कॅरेटीनचं प्रमाण अधिक असतं. ते अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असते. गाजराची कोशिंबीर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात. रोज एक गाजर खाल्ल्यानं हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार हे आजार दूर राहतात. त्यामुळे गाजराला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. रब्बी हंगामात गाजर पीकाचे योग्य व्यवस्थापण करून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
गाजर पिकासाठी जमीन -
या पिकाच्या लागवडीसाठी पूर्वमशागत व्यवस्थितरित्या करणे आवश्यक असते. यासाठी जमीन चांगली नांगरून जमीन तणमुक्त करावी लागते.या पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी मातीचा pH 5.5 ते 7 च्या दरम्यान असावा. जेणेकरून शेतकऱ्यांना गाजरच्या पिकातून चांगली कमाई होईल.
खत व्यवस्थापन -
ओले आणि न कुजलेले शेणखत वापरणे टाळावे.शेवटच्या नांगरणीच्या वेळी सुमारे 25-30 टन चांगले शेणखत आणि पेरणीच्या वेळी एक हेक्टर शेतात 30 किलो नत्र आणि 30 किलो पोटॅश प्रति हेक्टर वापरावे. पेरणीच्या 5-6 आठवड्यांनंतर 30 किलो वापरावे.
पेरणीनंतर पहिले पाणी द्यावे, त्यामुळे उगवण चांगली होण्यास मदत होईल. हिवाळ्यात 10-12 दिवसांनी द्यावे. गाजराला तीन ते चार पाणी द्यावे लागते. जास्त सिंचन देण टाळावे, कारण यामुळे मुळांचा आकार विकृत होवू शकतो.
गाजर लागवडीची योग्य वेळ -
आशियायी जाती -
या ऑगस्ट-सप्टेंबर हा कालावधी या वाणांच्या गाजरांच्या पेरणीसाठी सर्वोत्तम काळ आहे. या जातीचा रंग तांबडा, काळसर पिवळा असतो. गाजरे आकाराने मोठी असून आतील कठीण गाभा मोठा असतो. या जातीची गाजरे वरती जाड आणि टोकावडे निमुळते असतात. या जातीमध्ये 'अ' जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी असते. मात्र ही गाजरे चवीला गोड असून जास्त रसाळ असतात. पुसा केशर, पुसा मेघाली, सिलेक्शन 229 या गाजराच्या सुधारीत जाती आहेत.
युरोपीय जाती -
या वाणांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर हा कालावधी योग्य आहे.या गाजराचा रंग केशरी किंवा नारंगी असून आकाराने सारख्या जाडीचे असतात. या जातींच्या पानांची वाढ कमी असते. गाजरे खाताना कोरडी लागतात. लवकर काढणीला तयार होतात.
ऊदा- नँटेज, चॅटनी, पुसा जमदग्नी या गाजराच्या सुधारीत जाती आहेत.गाजराचे पीक किमान 90 दिवसांत तयार होते. निश्चितच अवघ्या तीन महिन्यात या पिकाचा शेतीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे.
गाजर पिकातील तण नियंत्रण -
गाजराच्या पिकांच्या आजूबाजूला अनेक तण वाढतात, हे अनावश्यक तण जमिनीतील ओलावा आणि पोषक घटक शोषून घेवून गाजर पिकाच्या वाढीवर आणि विकासावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे हे तण नियमितपणे शेतातून काढत राहणे अत्यंत आवश्यक असते.
Share your comments