गेल्या काही दिवसांपासून शेती करणे खूपच अवघड झाले आहे. याचे कारण म्हणजे शेतीसाठी जे काही लागते ते सर्वच महाग झाले आहे. असे असताना मात्र बाजारभाव खूपच कमी आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. यातच आता खरिपाच्या तोंडावर खतांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे आता अनेक ठिकाणी खतांचा काळा बाजार देखील केला जात आहे.
सध्या खते आयात करताना मागणीच्या तुलनेत देशात केवळ 20 टक्केच खताची निर्मिती केली जात आहे. यातच आता यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना वाढीव दराने खताची खरेदी करावी लागणार अशीच परस्थिती निर्माण झाली आहे. भारत देशाला सर्वाधिक खत हे रशियामधून पुरवले जाते पण सध्याच्या युध्दजन्य परस्थितीमुळे आतापर्यंत होणारा पुरवठा झालेला नाही. यामुळे हे दर वाढलेले आहेत.
सध्या डीएपीचे 50 किलोचे एक पोते हे 1 हजार 200 ते 1 हजार 350 रुपयांपर्यंत मिळत आहे. मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची गरज बघून त्यांची लूट केली जात आहे. सध्या भारत खत आयातीच्या इतर पर्यायांचा विचार करत आहे. भारतात खतांना अनुदान दिले जाते. यामाध्यमातून खताच्या खर्चाचा मोठा हिस्सा हे सरकार उचलते. यामुळे सरकारवर देखील याचा भार पडणार आहे.
सध्या सरकारने 30 लाख मेट्रिक टन डीएपी आणि 70 लाख मेट्रिक टन युरियाचा साठा केला आहे. आता येणाऱ्या काळात परिस्थिती कशी होईल यावरच सगळे गणित अवलंबून आहे. शेताची मशागत देखील वाढली आहे. डिझलचे दर वाढत असल्याने याचा फटका अनेकांना बसत आहे. यामुळे सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या;
अपघातात मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांच्या घरच्यांना मिळतात २ लाख, योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांची कुटूंब सावरली..
आता जुन्नरचे नाव सातासमुद्रापार घुमणार! शिवनेरी हापूसबाबाबत हालचाली सुरु..
बातमी कामाची! देशी गाई संभाळा आणि लाखो कमवा, ३३ प्रकारची अन्नद्रव्ये होतात तयार, वाचा सविस्तर
Share your comments