शेती कृषिपंपांचा वाढीव वीज बिलाच्या विरोधात त्यासोबतच शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.
तसेच या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत देखील मोठ्या प्रमाणात उमटले. त्यानंतर शासनाकडून विज बिल दुरुस्त करण्याचे आणि त्यासोबत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीचे प्रयत्न केले जातील असे आश्वासन मिळाल्यानंतर राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेतले होते. दरम्यान महावितरणने वीज बिलामध्ये दुरुस्ती करण्यासाठी शिबीर घेण्यास सुरुवात केली आहे. या शिबिरांना राज्यभरातून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली वीजबिल देखील दुरुस्त करून घेतली. ते राज्यभरात बऱ्याच शेतकऱ्यांची बिले मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या शेतकऱ्याला आलेले एक लाखापेक्षा जास्त वीज बिल दुरुस्ती नंतर झाले अवघे दोन हजार रुपये
या वीज बिले दुरुस्ती शिबिरामध्ये कागल तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सागर संकपाळ असे या शेतकऱ्याचे नाव असून कागल तालुक्यातील व्हन्नुर या गावातील ते आहेत. या शेतकऱ्याला तब्बल 1 लाख 9 हजार 750 रुपये इतकी वीज बिल आलेले होते. पण या शेतकऱ्याने विजबिलात दुरुस्ती करून घेतली तेव्हा हे बिल अवघ्या दोन हजार रुपये इतके झाले. त्यानंतर या शेतकऱ्यांनी हे बिल तात्काळ भरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आभार मानले.
या प्रकरणावरून दिसून येते की बऱ्याच शेतकऱ्यांची वीज बिले अशा वाढीव पद्धतीने आलेले असतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी विज बिल दुरुस्ती शिबिराच्या माध्यमातून आपली बिले दुरुस्त करून घ्यावी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आव्हान करण्यात आले आहे.
Share your comments