शेतीमधून केवळ मुख्य पिकातून जास्त उत्पन्न मिळते असे काही नाही. कारण काळाच्या ओघानुसार शेतीत बदल होत चालला आहे. सध्या शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे ओळत चालला आहे. भाजीपाला पिकामधून कमी वेळेत जास्त उत्पादन निघते मात्र त्यासाठी कष्ट सुद्धा तेवढेच लागतात आणि सोबत नियोजनही. सध्या भाजीपाला पिकात जास्त वाढत आहे तो म्हणजे लाल मुळा. या लाल मुळ्यातील चांगले वाण निवडून शेतकऱ्याना चांगले उत्पादन तसेच दर्जाही मिळणार आहे. बाजारात दर्जा असणाऱ्या लाल मुळ्याला भाव ही चांगला आहे. हिरव्या भाजीपाल्यांसाठी थंड वातावरण पोषक असते जे की या वातावरणाच्या आर्द्रतेमुळे पिकांची वाढ जोरदार होते. बाजारात जास्त करून भाज्याच दिसतात मात्र लाल मुळा हा कमी पाहायला
लाल मुळाचे वैशिष्ट्य
सर्वसामान्य लोकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी लाल मुळा नवीनच आहे मात्र लाल मुळ्यामध्ये पांढऱ्या मुळ्यापेक्षा जास्त अँटीऑक्सिडेंट असतात त्यामुळे उत्पादन ही जास्त निघते आणि बाजारात किमंत सुद्धा जास्त आहे. या मुळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा लाल रंगाचा असून आपण सप्टेंबर ते फेब्रुवारी महिन्याच्या कालावधीत पेरू शकतो. पूर्ण भारत देशात हा मुळा पेरला जातो ही सर्वात खास वैशिष्ट्य आहे. लाल मुळ्याची लागवड एक हेक्टर मध्ये केल्यास जवळपास १३५ क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते. मुळ्याची पेरणी केल्यानंतर २०-२५ दिवसांनी याची विविधता तयार होते.
लाल मुळा लागवडीसाठी या गोष्टी लक्षात ठेवा
लाल मुळ्याची लागवड करायची असेल तर त्यासाठी निचरा होणारी जमीन व वाळूची लोम माती असणारी जमीन लागते. लोम जमीन किंवा चिकणी मातीमध्ये लाल मुळ्याचे जास्तीत जास्त उत्पन्न निघते. लाल मुळ्याची लागवड ज्या मातीमध्ये करायची आहे त्या मातीचा PH ६.५ - ७.५ च्या दरम्यान असावा. पेरणी करण्याआधी शेतामध्ये ८-१० टन शेणखत तसेच कंपोस्ट खत सर्व बाजूला पसरावे.
अशी करा पेरणी
एक हेक्टर जमिनीसाठी ८ ते १० किलो बियाणे पुरेसे आहेत. प्रत्येक ओळींमधील अंतर ३० सेमी ठेवावे व पेरणी करताना दोन्ही रोपांतील अंतर १० सेमी ठेवावे. लाल मुळ्याचे उत्पन्न चांगले भेटावे म्हणून जमिनीत ८० किलो नायट्रोजन, ६० किलो फॉस्फरस आणि ६० किलो पोटॅश असे हेक्टरी टाकावे. तुम्ही जर योग्य प्रकारे नियोजन व व्यवस्थापन केले तर लाल मुळ्यातून लाखो रुपये कमवू शकता.
Share your comments