कांदा हे नगदी पीक आहे जे की उत्पन्नाच्या दृष्टीने उसाच्या पाठोपाठ कांद्याचा नंबर लागतो. कांदा हे लहरी पीक आहे जे की कधी शेतकऱ्यांना हसवते तर कधी डोळ्यातून पाणी काढते. मात्र जर कांद्याला भाव मिळाला की घर वर आल्यासारखे आहे. येवला तालुक्यातील धनकवाडी मधील जाधव बंधूनी कांद्याचे पीक लावून हे साध्य करून दाखवले आहे. साईनाथ भगवंत जाधव आणि अनिल भगवंत जाधव या दोघे भावंडांनी आपल्या घरावर १५० किलो कांद्याची प्रतिकृती उभारली आहे जे की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधत आहे. कांद्यासाठी प्रसिद्ध असणारा नाशिक जिल्ह्यातील या दोन शेतकऱ्यांनी असा प्रयोग केलेला आहे.
कशी सुचली संकल्पना?
कांद्याच्या पिकावर त्यांनी मोठे घर बांधले. जाधव बंधूनी पंधरा एकर मध्ये कांदा लावून जवळपास पंधरा लाख रुपये नफा कमावला आज मात्र त्यासाठी लागणारे परिश्रम सुद्धा जाधव बंधूनी घेतले आहेत. लासलगाव च्या बाजार समितीत कांद्याची प्रतिकृती त्यांनी पहिली होती. लासलगाव ही बाजारपेठ आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. आपण सुद्धा आपल्या घरावर वेगळे काही तरी करायचे म्हणून त्यांनी कांद्याची प्रतिकृती उभारली.
काय आहे यामगचा हेतू?
येवला तालुक्यातील धनकवाडी मधील साईनाथ जाधव आणि अनिल जाधव या दोघांना ३० एकर शेती आहे मात्र येवला तालुका पहिल्यापासूनच दुष्काळी तालुका आहे. कमी प्रमाणात पाऊस पडत असल्याने जाधव बंधूनी त्यांच्या दहा ते पंधरा एकर शेतात कांद्याचे उत्पन्न घेऊन सगळा खर्च वजा करून पंधरा लाख रुपये शिल्लक राहिले जे की दोघांनी घर बांधायचे आयोजले. कांदा लासलगाव बाजार समितीत घेऊन गेले त्यावेळी तिथे कांद्याची प्रतिकृती उभारली होती. दोघांनी मिळून ठरवले की कांद्याला भाव मिळाला की आपण सुद्धा अशीच प्रतिकृती उभारायची.
150 किलो वजन अन् 18 हजार रुपये खर्च :-
जाधव बंधू याना १५० किलो कांद्याची प्रतिकृती उभा करण्यासाठी जवळपास १८ हजार रुपये खर्च आला. हा खर्च त्यांनी फक्त यासाठी केला की आपले घर उभे जे आहे ते फक्त आणि फक्त कांद्यामुळे. कांदा लांबून जरी दिसला तरी लोक खूप वेळ त्याकडे बघत राहतात.
Share your comments