नवी दिल्ली- राष्ट्रीय कृषी पत्रकारितेत नवा मापदंड निर्माण करणाऱ्या कृषी जागरण समुहाने नवी मोहिम हाती घेतली आहे. माध्यमांच्या वेगवान प्रवाहात शेतकऱ्यांना सामील करण्यासाठी ‘शेतकरी-एक पत्रकार’ (farmer the journalist) उपक्रमास सुरूवात केली आहे. आपल्या परिसरातील शेतीविषयक घडामोडींना प्रकाशित करण्याचे सशक्त माध्यम उपलब्ध होणार आहे. मध्य प्रदेश शेतकरी कल्याण आणि कृषी विकास मंत्री कमल पटेल यांच्या उपस्थितीत मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
कृषी जागरण (Krishi Jagran) आणि कृषी वर्ल्डचे मुख्य संपादक एम. सी. डॉमिनिक यांनी स्वतंत्र कृषी पत्रकारितेला नवा आयाम दिला. ‘फार्मर फर्स्ट’ ही अभिनव संकल्पना आखली तसेच, शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने शेतकरी ब्रँडच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
माध्यमांच्या जगात शेतकरी:
राष्ट्रीय अर्थकारणात कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. कृषी क्षेत्राच्या बळकटीसाठी शेतकऱ्यांचे सक्षमीकरण अत्यंत महत्वाचे आहे. अचूत व वेगवान माहिती प्रसारातून शेतकऱ्यांना माहितीप्रदान करण्यासाठी माध्यमांचे क्षेत्र महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे शेती व शेतीविषयक प्रश्नांना मुख्य प्रवाहात स्थान देण्यासाठी ‘शेती-एक पत्रकार’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
Share your comments