1. बातम्या

जुन्या मोटारीपासून शेतीचे यंत्र, कमी खर्चात पेरणी फवारणी नांगरणी शक्य; बीडच्या रँचोची राज्यात चर्चा..

शेतकरी कधी काय करतील याचा नेम नाही. याची प्रचिती अनेकदा आपल्याला आली असेल. आता बीडच्या एका शेतकऱ्याने एक वेगळेच यंत्र तयार केले आहे. यामुळे याची राज्यात चर्चा रंगली आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
farmar

farmar

शेतकरी कधी काय करतील याचा नेम नाही. याची प्रचिती अनेकदा आपल्याला आली असेल. आता बीडच्या एका शेतकऱ्याने एक वेगळेच यंत्र तयार केले आहे. यामुळे याची राज्यात चर्चा रंगली आहे. बीड जिल्ह्यातल्या मौज येथील एका शेतकर्‍याने शेती करण्यासाठी लागणार्‍या पेरणी आणि कोळपणी यंत्राची निर्मिती केली आहे. यामुळे अनेक कामे अगदी सहज होत आहेत. येथील बप्पासाहेब डावकर हे प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी हे यंत्र तयार केले असून यामुळे मजुरांची देखील जास्त गरज लागणार नाही.

त्यांनी घरांमध्ये पडून असलेली जुनी टू व्हीलर बाहेर काढली, आणि त्यावरच सुरुवातीला पेरणी यंत्र जोडले. त्यानंतर त्याच पेरणी यंत्राला सोबत फवारणी यंत्र जोडून उपयोग केला. आता तर शेतीची सगळी मशागत ते या यंत्राद्वारे करतात. यामुळे पैशांची आणि वेळेची मोठी बचत होत आहे. त्यांनी सुरुवातीला या यंत्राचा वापर स्वत: च्या शेतात पेरणी आणि मशागत करण्यासाठी केला होता. त्यानंतर परभणीच्या कृषी प्रदर्शनामध्ये त्यांनी याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि शेतकर्‍यांच्या मागणीवरून या यंत्राची त्यांनी विक्री सुरू केली आहे. यामुळे याचा अनेकांना फायदा होत आहे.

सध्या आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकर्‍यांना नवनवीन अवजारांची गरज असते, मजूरांची सध्या खूपच मागणी वाढल्याने मजूर मिळत नाहीत, तसेच मिळाले तर त्यांना जास्त पैसे द्यावे लागत आहेत. त्यांनी हीच गरज ओळखून अगदी कमी खर्चात शेतकर्‍यांना परवडणार हे यंत्र तयार केले आहे. याचा फायदा अनेक शेतकर्‍यांना होत आहे.अगदी कमी वेळात हे यंत्र पेरणी आणि फवारणी करत आपल्या जुन्या मोटारसायकलला थ्री व्हीलरमध्ये कन्व्हर्ट करून हे यंत्र बनवण्यात आले. हे यंत्र बनवण्यासाठी त्यांना एक लाख दहा हजार रुपये एवढा खर्च आला आहे.

तसेच याला पेट्रोल देखील कमी लागते. पेरणी यंत्राबरोबरच त्यांनी एक कोळपणी यंत्र देखील तयार केल आहे. अल्पभूधारक शेतकर्‍यांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करनं परवडत नाही. त्यामुळे त्यांनी या यंत्राची निर्मिती केली आहे. पिकामध्ये वखारणी आणि कोळपणी करणं अगदी सोपं असून उभ्या पिकात देखील तण काढण्यासाठी या यंत्राचा वापर केला जात आहे. तसेच याला रिवर्स गेअर बसवण्यात आला असल्याने हे चालवण्यासाठी देखील अगदी सोप आहे. यामुळे अनेक शेतकरी याचा वापर करत आहेत.

English Summary: Farming equipment from old car, sowing spray plowing possible low cost; Discussion Beed Rancho Published on: 21 February 2022, 04:44 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters