महिला चार महिन्यांपूर्वी च महाविकास आघाडी सरकारने मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता योजनेतून शेतात रस्त्यांचे जाळे उभारण्याचा निर्धार हाती घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून जे रस्ते रखडले होते त्या रस्त्यांची कामे सुरळीत लागणार आहेत. शेतामध्ये रस्ते नसल्यामुळे शेतातून माल बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. शेतरस्ते नसल्यामुळे उसाचे पीक घेण्यासाठी सुद्धा अडचण निर्माण होत आहे पण आता या योजनेच्या माध्यमातून शेतात रस्ते तयार होणार आहेत. या योजनेचा पहिला टप्पा उस्मानाबाद जिल्ह्यातील ६४ रस्त्यांचा आहे. १ किमीसाठी २४ लाखाचा निधी मंजूर केल्याचे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे.
पहिल्या टप्प्यात 64 पाणंद रस्त्यांना मंजूरी :-
शेतामध्ये रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात तर पायी मार्ग सुद्धा फुटत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात सुद्धा जाणे मुश्किल होते. शेतातून शेतमाल जरी बाहेर काढायचा म्हणलं तरी सुद्धा वाहन आत जाऊ शकत नाही त्यामुळे आता मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता योजनेतून उस्मानाबाद जिल्ह्यातील ६४ रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्यात भरपूर शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
अशी आहे मंजूर झालेल्या रस्त्यांची यादी :-
उस्मानाबाद जिल्ह्यातील ७ तालुक्यांमध्ये हे जाळे उभारले जाणार आहे जे की कळंब तालुक्यात २८ रस्ते तर उमरगामध्ये १८, तुळजापूर ५, भूम ३, उस्मानाबाद 3 आणि लोहारा 4 व वाशी मध्ये ३ रस्ते असे रस्ते उभारले जाणार आहेत. अशा प्रकारे पहिल्या टप्यात ६४ रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. शेतकऱ्यांचा सुद्धा या योजनेला चांगलाच पाठिंबा मिळाला आहे.
1 किलोमीटरसाठी 24 लाख रुपये :-
आतापर्यंत पक्के रस्ते झालेच नाहीत जे की एमआरईजीएस अंतर्गत एका किमीसाठी ५ लाख रुपयांचा निधी मिळत न्हवता. परंतु मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता योजनेमधून शेतरस्तेसाठी चांगला निधी मिळाला आहे. या योजनेच्या निधीमधून चांगले रस्ते सुद्धा होणार आहेत तसेच जे रस्ते राहिले आहेत ते रस्ते उभारणीसाठी सुद्धा लवकरच प्रयत्न सुरू होतील. या योजनेमधून ज्या ६४ रस्त्यांची बांधणी होणार आहे त्यांना मोठ्या प्रकारे निधी मिळणार आहे.
Share your comments