पालघर -जिल्ह्यात चिकूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. डहाणू आणि तलासरी तालुक्यात १० हजार हेक्टर तर पालघर तालुक्यातील ७ हजार हेक्टर क्षेत्रात चिकूचे उत्पादन घेतले जाते. पालघर मधील चिकूला देशभरातून मागणी असते. परंतु जिल्ह्यातील चिकू उत्पादक शेतकरी सध्या चिंताग्रस्त झाले आहेत. त्यांच्या चिंतेचे कारण ठरले आहे, गेल्या हंगामातील फळ पीक विमा.
गेल्या हंगामातील चिकू फळ पीक विमाची रक्कम अजूनही मिळालेली नाही. यामुळे चिकू बागायतीच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. यंदाच्या विम्याच्या अटी-शर्तीमध्ये काही जाचक मानांकने घातली आहेत. यामुळे अधिकतर शेतकऱ्यांना ५० टक्के विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. गेल्या पावसाळी हंगामात पालघर जिल्ह्यील ३ हजार ९०० चिकू बागायतदारांनी फळ पीक विमा घेतला होता. या शेतकऱ्यांनी प्रति हेक्टरी २ हजार ७५० रुपयांचा हप्ता भरला आहे.
चार ते आठ दिवस ९० टक्के सापेक्ष आर्द्रता यासह २० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाच्या नोंदीच्या आधारे शेतकऱ्यांना हेक्टरी ५५ हजार रुपयांची विमा रक्कम ३१ डिसेंबरपूर्वी मिळायला हवी होती. दरम्यान विमा कंपनीने हवामानाच्या माहितीसाठी स्कायमेट या शासकीय संस्थेच्या आधार घेऊन हवेतील सापेक्ष आर्द्रता व पर्जन्यमानाविषयीची महिती गोळा करण्यात आली आहे. परंतु सर्वाधिक उत्पादन घेतले जाणाऱ्या डहाणूमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. परंतु पीक विम्याच्या अटींची पूर्तता होत नसल्याने शेतकरी विमा पासून वंचित आहेत. काही अपवादात्मक शेतकरी वगळता अधिक तर शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात चिकू पीक विमा मंजूर झाला आहे. दरम्यान चिकू उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी आणि लांबलेला पावसाळा मुळे उत्पादन संपुष्टात आले होते. हाती पैसा नसल्याने फळबागाची मशागतीचे कामे कमी झाली आहेत. त्यामुळे मार्च महिन्यापासून पुन्हा येणाऱ्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
Share your comments